शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
3
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास
4
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
5
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
6
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
7
IND vs BAN : पहिला सामना जिंकताच BCCI ची मोठी घोषणा; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर
8
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
9
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
10
'वयस्कर' अश्विनला तोड नाय! भारताला अडचणीतून बाहेर काढले; सामना जिंकवला, विक्रमही नोंदवला
11
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
12
'लाफ्टर शेफ' शोला लागली नजर? एकानंतर एक सेलिब्रिटींसोबत अपघात; राहुल वैद्यच्या चेहऱ्यावर...
13
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
14
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
15
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
16
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
17
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
18
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
19
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
20
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज

नागपुरातील हवेचे आरोग्य बिघडले; वारंवार आजारी पडण्याचे वाढले प्रमाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2022 8:15 AM

Nagpur News आपल्याला जाणवत नसली तरी प्रदूषित हवा नागपूरकरांचे आराेग्य खिळखिळे करीत आहे.

नागपूर : आपल्याला जाणवत नसली तरी प्रदूषित हवा नागपूरकरांचे आराेग्य खिळखिळे करीत आहे. हवेची गुणवत्ता ही वायू गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) वरून कळते. सध्या नागपूरच्या सिव्हिल लाइन्समध्ये नाेंदविल्यानुसार एक्यूआय ११२ वर आहे. इतर ठिकाणी ताे १५० च्या वर असण्याची शक्यता आहे. एक्यूआयची ही स्थिती लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्ती अशा संवेदनशील गटासाठी धाेकादायक आहे. एका आकड्यानुसार २०२१ साली वायुप्रदूषणामुळे वेगवेगळ्या आजारांच्या कारणाने १००० च्या वर मृत्यू झाले व लाखाे रुपयांचे नुकसानही झाले. यावरून वायुप्रदूषणाचा धाेका लक्षात येऊ शकताे.

- शहराचा एअर क्वाॅलिटी इंडेक्स

सिव्हिल लाइन्स ११२

उत्तर अंबाझरी रोड १८५

हिंगणा रोड १८८

सदर १८४

- काय आहे एअर क्वाॅलिटी इंडेक्स?

एअर क्वाॅलिटी इंडेक्स म्हणजे हवा गुणवत्ता निर्देशांक. याद्वारे हवेची गुणवत्ता तपासली जाते आणि भविष्यातील वायुप्रदूषणाची कल्पना येते.

- एअर क्वाॅलिटी इंडेक्स किती हवा?

० ते ५० : एकदम स्वच्छ हवा

५१ते १००: हवेची शुद्धता समाधानकारक

१०१ ते २०० : हवेची शुद्धता मध्यम

२०१ ते ३०० : हवेची शुद्धता वाईट

३०१ ते ४०० : हवेची शुद्धता जास्त वाईट

४०१ ते ५०० : हवेची शुद्धता गंभीर

 

वायुप्रदूषणाचा थेट शरीरावर परिणाम

वायुप्रदूषणामुळे अनेक आजारांचा विळखा वाढताे. आधी असलेले आजार बळावण्याचीही शक्यता असते. दमा, अस्थमासारखे आजार बळावतात. क्राॅनिक ऑबस्ट्रक्टिव्ह पल्माेनरी डिसिजच्या रुग्णांना अटॅकची शक्यता वाढते. फुप्फुसांचे आजार वाढतात व श्वास घेण्यास त्रास हाेताे. श्वासनलिकेमध्ये सूज येण्याची शक्यता असते. डाेळ्यांची जळजळ, त्वचेची समस्या आदी नियमित आजार आहेत. लिव्हर व हृदयावरही परिणाम हाेतात. ब्राेंकाईटिसचा धाेका वाढताे. सातत्याने वायुप्रदूषणाच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तीची वयाेमर्यादा घटते.

डाॅ. समीर अर्बट, पल्माेनाेलाॅजिस्ट

- यामुळे वाढते प्रदूषण

नागपूरच्या जवळ असलेले औष्णिक वीजनिर्मिती केंद्र हे प्रदूषणाच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे. शिवाय वाहनातून उत्सर्जित हाेणारे कार्बन डायऑक्साइड, कार्बन माेनाक्साइड, नायट्राेजन डायऑक्साइड हे घटक कारणीभूत ठरतात. उघड्यावर कचरा जाळल्यानेही प्रदूषणाचा स्तर वाढला आहे. मात्र, नागपूरमध्ये सर्वाधिक प्रदूषण वाढविणारा घटक म्हणून पीएम-१० व पीएम-२.५ हे धूलिकण हाेय, जे वाढत्या बांधकामामुळे वाढले आहे. सध्या नागपूरच्या वातावरणात पीएम-२.५ या प्रदूषक घटकाचे प्रमाण डब्ल्यूएचओच्या मर्यादेपेक्षा आठ पट अधिक आहे.

- प्रदूषण नियंत्रण मंडळ उदासीन

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे एकमेव माॅनिटरिंग स्टेशन सिव्हिल लाइन्समध्ये आहे. प्रदूषणाचा स्तर अधिक असलेल्या सीए राेड, सदर, वर्धा राेड, एमआयडीसी एरिया, अमरावती राेड, भंडारा राेड या भागाचे माॅनिटरिंग हाेतच नाही. उल्लेखनीय म्हणजे एमपीसीबीच्या वेबसाइटवर गेल्या तीन महिन्यांचा डेटा अपडेटच केलेला नाही. अधिकाऱ्यांनी एक्यूआयच्या स्थितीवर काही बाेलण्यासही नकार दिला.

टॅग्स :air pollutionवायू प्रदूषण