वसीम कुरैशी ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रीय विमान कंपनी एअर इंडियाने नागपूरकडे नेहमीच कानाडोळा केला आहे. ही कंपनी वेळेच्या बाबतीत नागपूरला नेहमीच दुय्यम दर्जा देत असल्याचे दिसून येत आहे. त्याच कारणामुळे गेल्या तीन महिन्यांपासून मुंबई-नागपूर आणि नागपूर-मुंबईच्या सायंकाळच्या उड्डाणांना नेहमीच उशीर होत आहे.जुलैपासून सुरू झालेल्या हज यात्रा फ्लाईट नंबर एआय-६२९/३० मध्ये ही समस्या येत आहे. एअर इंडियाच्या शेड्युलिंग शाखेने नागपूरला उड्डाण सेवेला दुय्यम दर्जा दिला आहे.सोमवारी एआय-६२९ हे विमान मुंबईहून निर्धारित वेळेत रवाना झाले नाही. रात्री १०.३० पर्यंत प्रवासी नागपुरात विमानाची वाट पाहत होते. नागपुरातून मुंबईकडे फ्लाईट नं. एआयई-६३० ची निर्धारित वेळ रात्री ९.४० आहे. पण हे विमान मुंबईवरून उशिरा आल्यामुळे रात्री रवाना झाले.एअर इंडियाच्या ताफ्यात येणाऱ्या नवीन विमानांपैकी नागपूरला मिळणारे एक विमान भुवनेश्वरला नेण्यात आले. या विमानाद्वारे भुवनेश्वर-बँकॉक प्रवास सुरू आहे. गेल्यावर्षीही नागपुरातून पाच शहरांसाठी उड्डाणे सुरू होण्याची चर्चा होती. इंदूर- नागपूर- जयपूर - इंदूरसह दक्षिण भारताकरिता काही उड्डाणे प्रस्तावित होती. पण तो प्रस्तावही थंडबस्त्यात आहे.
एअर इंडियाची नागपूरला सापत्न वागणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 10:50 AM
राष्ट्रीय विमान कंपनी एअर इंडियाने नागपूरकडे नेहमीच कानाडोळा केला आहे. ही कंपनी वेळेच्या बाबतीत नागपूरला नेहमीच दुय्यम दर्जा देत असल्याचे दिसून येत आहे.
ठळक मुद्देनागपूर-मुंबई विमानाला नेहमीच उशीर