लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सहा महिने बंद राहिल्यानंतर आता एअर इंडिया नागपूर-मुंबई-नागपूर विमानसेवा सुरू करीत आहे. याचे संचालन १० सप्टेंबरपासून पूर्ववत होणार आहे. एअरलाईन्सने बुकिंगही सुरू केले आहे. या कारणामुळे आता सिव्हील लाईन्स येथील एअर इंडियाच्या कार्यालयात हळूहळू बुकिंगला वेग येत आहे.कोरोना महामारीनंतर लॉकडाऊनच्या सुरुवातीला एअर इंडियाची नियमित उड्डाणे बंद झाली होती. आता एआय ६२७/६२८ उड्डाण आठवड्यात तीन दिवस राहणार आहे. एआय ६२७ मुंबई-नागपूर विमान मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी सकाळी ६.१५ वाजता मुंबईहून रवाना होऊन सकाळी ७.४० वाजता नागपुरात पोहोचेल. लॉकडाऊनपूर्वी या उड्डाणाचे संचालन ए-३२० विमानाने करण्यात येत होते. याची प्रवासी क्षमता १५० सिटची होती. आता ए-३२१ विमानाचा उपयोग करण्यात येणार आहे. या विमानाची प्रवासी क्षमता १७० सिटची आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लॉकडाऊन संपल्यानंतर एअर इंडियाचे नागपूर-दिल्ली-नागपूर विमान आठवड्यात तीन दिवस सुरू आहे. पण वेळेमुळे नागपूर-मुंबई विमानाला मुंबई विमानतळावर स्लॉट मिळाला नव्हता. याच कारणामुळे याचे संचालन थांबले होते.प्रवाशांना मिळणार पॅकेज फूडकेंद्र सरकारची मंजूरी मिळाल्यानंतर आता एअरलाईन्स विमानांमध्ये प्रवाशांसाठी खानपानची सुविधा सुरू करीत आहे.७ सप्टेंबरपासून विमानांमध्ये प्रवाशांना पॅकेज फूड देण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.