लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेतनागपूर-छिंदवाडा ब्रॉडगेजचे काम पूर्ण झाल्यानंतर या मार्गावर केवळ ५० किलोमीटर प्रतितास या वेगाने रेल्वेगाड्या धावू शकणार आहेत. या सेक्शनमध्ये ६० किलोमीटर प्रतितास वेगाने रेल्वेगाड्या चालविण्याची परवानगी मागण्यात आली होती. परंतु रेल्वे बोर्डाने ५० किलोमीटर प्रतितास वेगाने गाड्या चालविण्याची परवानगी दिली आहे.नागपूर-छिंदवाडा या १४९ किलोमीटरच्या मार्गावर बोगदे, पूल आणि घाट सेक्शन असल्यामुळे सध्या या मार्गावर केवळ प्रतितास ५० किलोमीटरच्या वेगाने रेल्वेगाड्या चालविण्याची परवानगी देण्यात आली आहे. परंतु भविष्यात विविध बाबींचा अभ्यास करून काही सेक्शनमध्ये रेल्वेगाड्यांचा वेग वाढविण्याचा विचार होऊ शकतो. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार नॅरोगेजचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर केल्यानंतर आणि रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण केल्यानंतर २८ ऑगस्टला या मार्गावर रेल्वेगाड्या चालविण्याची परवानगी मिळाली आहे. विद्युत शाखेकडूनही परवानगी मिळाली आहे. नागपूर-छिंदवाडा या मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्याचे काम मागील १० वर्षांपासून सुरू होते. अधिक वेळ लागल्यामुळे या कामाची किंमत वाढली. अशा स्थितीत हा मार्ग तयार झाला आहे. परंतु कोरोनामुळे या मार्गावर रेल्वेगाड्या सुरू करण्यात आलेल्या नाहीत. पूर्वी नागपूर-छिंदवाडा या मार्गावर नॅरोगेज रेल्वेगाड्या प्रतितास ३५ किलोमीटरच्या वेगाने धावत होत्या. प्रत्येक रेल्वेस्थानकावर थांबल्यानंतर ६ ते ७ तासानंतर या गाड्या छिंदवाड्याला पोहोचत होत्या. आता नॅरोगेजचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर झाल्यानंतर ५० किलोमीटर प्रतितास या वेगाने रेल्वेगाडी धावल्यास केवळ ३.३० तास लागणार आहेत. रस्ते मार्गाने नागपूर-छिंदवाडा १२५ किलोमीटर आहे. बसनेसुद्धा प्रवास केल्यास ३.३० तास लागतात. परंतु बसेसच्या तुलनेत रेल्वेने अर्धेच प्रवासभाडे लागते. अशा स्थितीत छिंदवाडा मार्गावरील रेल्वेगाड्यांना अधिक प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा वर्तविण्यात येत आह
नागपूर-छिंदवाडा ब्रॉडगेजला हवाय वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 11:29 PM
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत नागपूर-छिंदवाडा ब्रॉडगेजचे काम पूर्ण झाल्यानंतर या मार्गावर केवळ ५० किलोमीटर प्रतितास या वेगाने रेल्वेगाड्या धावू शकणार आहेत. या सेक्शनमध्ये ६० किलोमीटर प्रतितास वेगाने रेल्वेगाड्या चालविण्याची परवानगी मागण्यात आली होती. परंतु रेल्वे बोर्डाने ५० किलोमीटर प्रतितास वेगाने गाड्या चालविण्याची परवानगी दिली आहे.
ठळक मुद्दे५० किलोमीटरचा मिळाला वेग : हवा आहे प्रतितास ६० किलोमीटरचा वेग