शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
2
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
3
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
4
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
5
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
6
TATA IPL Auction 2025 Live: भारतीय खेळाडूंचा लिलावात बोलबाला; पंत, अय्यर अन् चहल यांच्यावर पैशांचा पाऊस
7
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
8
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
9
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
10
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
11
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
12
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
13
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
14
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
15
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
16
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
17
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
18
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...
19
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड

नागपूरच्या आकाशात विमान अपघात थोडक्यात टळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 12:35 AM

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी इंडिगो एयरलाईन्सच्या विमानाचा अपघात थोडक्यात टळला. पायलटला वेगवान वाऱ्यामुळे टच डाऊन झोनचा योग्य अंदाज बांधता आला नाही. त्यामुळे विमानाने धावपट्टीवर उतरताना पुन्हा उड्डाण भरली. त्यानंतर आकाशात काहीवेळ घिरक्या घातल्यानंतर ते सुखरुप धावपट्टीवर उतरले. या घटनेमुळे सुदैवाने कोणतीही हाणी झाली नाही.

ठळक मुद्देकोणतीही हाणी नाही : धावपट्टीवर उतरताना पुन्हा भरली उड्डाण

वशीम कुरैशी

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी इंडिगो एयरलाईन्सच्या विमानाचा अपघात थोडक्यात टळला. पायलटला वेगवान वाऱ्यामुळे टच डाऊन झोनचा योग्य अंदाज बांधता आला नाही. त्यामुळे विमानाने धावपट्टीवर उतरताना पुन्हा उड्डाण भरली. त्यानंतर आकाशात काहीवेळ घिरक्या घातल्यानंतर ते सुखरुप धावपट्टीवर उतरले. या घटनेमुळे सुदैवाने कोणतीही हाणी झाली नाही.टच डाऊन झोन (लॅन्डिंग पॉईन्ट)चा योग्य अंदाज घेण्यात चुक झाल्यामुळे विमानाचे अपघात अनेकदा घडले आहेत. इंडिगो एयरलाईन्सच्या ६ ई ७१०२ विमानाचा अपघात पायलटच्या सतर्कतेमुळे टळला. ७२ आसनक्षमतेचे हे विमान हैदराबाद येथून निर्धारित वेळ सायंकाळी ६.२० वाजतापेक्षा आधी, म्हणजे सायंकाळी ५.३० वाजता नागपुरात पोहोचले. त्यावेळी वारे वेगात होते. परिणामी पायलटला टच डाऊन झोनचा योग्य अंदाज बांधता आला नाही व विमान खाली उतरताना निर्धारित जागेपासून पुढे निघून गेले. त्यामुळे पायलटने पुन्हा विमानाची उड्डाण भरली. हे विमान काहीवेळ अगदी जवळून आकाशात फिरत होते. परिसरातील नागरिक विमानाकडे कौतुकाने पहात होते.मिहान इंडिया कंपनीचे वरिष्ठ विमानतळ संचालक विजय मुळेकर यांनी याविषयीची तांत्रिक माहिती दिली. विमान टच डाऊन पॉईन्टपासून १००० मीटर अंतरापर्यंत धावपट्टीवर उतरविता येते. वेगवान वारे किंवा अन्य कारणांनी असे करण्यात अपयश आल्यास विमानाची उड्डाण भरून त्याला परत धावपट्टीवर उतरवावे लागते असे मुळेकर यांनी सांगितले.हा पहिला प्रसंग नाहीशहरामध्ये अगदी जवळून विमान उडण्याचा हा पहिला प्रसंग नाही. यापूर्वी ट्रेनिंग व टेस्टींग विमाने जवळून उडताना पहायला मिळाली होती. एयर इंडिया एमआरओ व अन्य कारणांनी नागपुरात ट्रेनिंग व टेस्टींग विमानांची उड्डाणे वाढली आहेत.एयर एशियाच्या विमानाला विलंबएयर एशियाचे नागपूर-बेंगळुरू विमान मंगळवारी दुपारी १ वाजता ऐवजी दुपारी १.४५ वाजता रवाना झाले. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बेंगळुरू विमानतळावरील कंजेशनमुळे या विमानाला विलंब झाला.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar International Airportडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूरIndigoइंडिगो