शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
10
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
11
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
12
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
13
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
14
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
15
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
17
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
18
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
19
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
20
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...

विमान दुरुस्तीचे धडे मिळणार नागपुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 8:46 PM

विमानाच्या देखभाल आणि दुरुस्तीचे प्रशिक्षण नागपूरच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था(आयटीआय)मध्ये मिळणार आहे. त्यासंदर्भातील पत्र नागपूर आयटीआयला प्राप्त झाले आहे.

ठळक मुद्देभारतात फक्त नागपूरच्या आयटीआयला मिळाली अभ्यासक्रमाची मंजुरीपहिल्या सत्रात मिळणार २० विद्यार्थ्यांना प्रवेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विमानाच्या देखभाल आणि दुरुस्तीचे प्रशिक्षण नागपूरच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था(आयटीआय)मध्ये मिळणार आहे. त्यासंदर्भातील पत्र नागपूर आयटीआयला प्राप्त झाले आहे. ‘एरोनॉटिकल स्ट्रक्चर अ‍ॅण्ड इक्युपमेंट फीटर’असे अभ्यासक्रमाचे नाव आहे. या माध्यमातून देशात पहिल्यांदा विमानाच्या दुरुस्तीच्या अभ्यासक्रमाचा मान नागपूरला मिळाला आहे.केंद्र सरकारच्या कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय व फ्रान्सच्या दसॉल्ट एव्हीएशन कंपनीशी यासंदर्भात सामंजस्य करार झाला आहे. तीन वर्षांसाठी या अभ्यासक्रमाची जबाबदारी दसॉल्ट कंपनीने घेतली आहे. विमान कंपन्यांच्या आंतरराष्ट्रीय मानकाप्रमाणे कुशल मनुष्यबळाची आवश्यकता आहे. भारतीय वायुसेनेची कार्यक्षमता वाढविण्यासाठी दसॉल्ट एव्हीएशन ही कंपनी साहित्याच्या डिझाईनपासून ते उत्पादन आणि त्याची देखभाल करते. या कंपनीने प्रशिक्षण आणि शैक्षणिक उपक्रम विकसित करण्यासाठी दसॉल्ट स्कील अकादमीची स्थापना केली आहे. या अकादमीच्या माध्यमातूनच नागपूर आयटीआयमध्ये प्रशिक्षणासाठी संपूर्ण यंत्रसामुग्री उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचबरोबर तीन वर्ष दसॉल्ट अकादमीच्या तज्ज्ञांकडून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हा अभ्यासक्रम सुरू झाल्यामुळे नागपूरच्या विद्यार्थ्यांना जागतिकस्तराचे प्रशिक्षण उपलब्ध होणार आहे. 

प्रवेश प्रक्रियेला सुरुवातदहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमात प्रवेश मिळण्याची संधी आहे. आयटीआयमध्ये २०१९-२० या सत्रासाठी ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज केले होते, त्या सर्व विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासंदर्भात एसएमएस पाठविण्यात येणार आहे. २१ सप्टेंबरपासून प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमासाठी आयटीआयच्या संकेतस्थळावर नोंदणी करायची आहे. २५ सप्टेंबर रोजी सायंकाळी गुणवत्ता यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. २६ सप्टेंबर रोजी समुपदेशन फेरीद्वारे उमेदवाराचे प्रवेश निश्चित केले जाणार आहे.आयटीआयने केली तयारीदसॉल्ट अकादमीने वर्कशॉपसाठी ले-आऊट दिले आहे. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाला इमारतीसाठी पत्र दिले आहे. तीन वर्ष दसॉल्ट प्रशिक्षणाची संपूर्ण मशीनरी पुरविणार आहे. नागपूर आयटीआयला या अभ्यासक्रमासाठी शिक्षकांच्या नियुक्तीची मान्यता मिळाली आहे. यावर्षी २० विद्यार्थ्यांची पहिली बॅच सुरू करण्यात येणार आहे. पुढच्या वर्षी दोन बॅचमध्ये अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण होणार आहे.जागतिक दर्जाचे मिळणार प्रशिक्षणविमान उत्पादनाच्या क्षेत्रातील कंपन्यांमध्ये कुशल मनुष्यबळाचा अभाव आहे. भारतात पहिल्यांदाच विमानाच्या देखभाल व दुरुस्तीचे प्रशिक्षण नागपूर आयटीआयमध्ये सुरू होणार आहे. जागतिक दर्जाचे हे प्रशिक्षण राहणार असून, नागपूरच्या विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे.हेमंत आवारे, प्राचार्य, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नागपूर

 

 

 

 

 

टॅग्स :iti collegeआयटीआय कॉलेजnagpurनागपूरairplaneविमान