शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: अजितदादा भाकरी फिरवणार की शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार? कोण ठरेल वरचढ?
2
मतदान आटोपल्यावर फडणवीस पोहोचले संघ मुख्यालयात; सरसंघचालकांशी २० मिनिटे चर्चा
3
शिंदे, ठाकरे, फडणवीस की पवार..; मुख्यमंत्रिपदासाठी पहिली पसंती कोणाला? पाहा...
4
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
5
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
6
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
7
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
8
"यावेळी चेतेश्वर पुजारा टीम इंडियात नसणार..."; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा आनंद गगनात मावेना!
9
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
10
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
11
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
12
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
13
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
14
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्रात एक्झिट पोलचे अंदाज समोर; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
15
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
16
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
17
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...
18
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी
19
IND vs AUS: शुबमन गिल संघात केव्हा परतणार? बॉलिंग कोच मॉर्कलने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
20
Fact Check: मुख्यमंत्र्यांचा फेक व्हिडिओ व्हायरल;  'लोकमत'चं नाव आणि लोगो वापरून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

अजब प्रेम की खतम कहानी!

By admin | Published: June 04, 2016 2:48 AM

कानपुरातील (उत्तरप्रदेश) निशा अन् सरवर या भिन्न धर्मिय तरुण तरुणीचे प्रेम प्रकरण वेगळ्या धाटणीचे आहे.

जीवाच्या धाकाने गाव सोडले : जीव दिला, जीव घेतला नरेश डोंगरे  नागपूरकानपुरातील (उत्तरप्रदेश) निशा अन् सरवर या भिन्न धर्मिय तरुण तरुणीचे प्रेम प्रकरण वेगळ्या धाटणीचे आहे. पाच वर्षांपूर्वी त्याची कुणकुण दोघांच्याही घरच्यांना लागली होती. अर्थात्च तीव्र विरोध, भांडणे आणि दोन गटात हाणामारी देखील झाली. दोघांनाही घरच्यांकडून ‘काट डालेंगे’अशी धमकी मिळाली. मात्र, पे्रमवीर कुठे धमक्यांना भीक घालतात? निशा अन् सरवरही कुणाला भीत नव्हते. दोघांच्या घरच्यांकडून त्यांच्या हालचालीवर डोळा असतानाही त्यांच्यातील दुरावा कमी झाला नाही. सारखे दडपण, मारहाण, धमक्या मिळत असल्याने त्यांनी अखेर तीन वर्षांपूर्वी प्रेमविवाह करण्याचा निर्णय घेतला. दोन्हीकडून तीव्र विरोध झाल्याने जीवाच्या भीतीने आणि एकत्र राहण्याच्या उत्कटतेने निशा आणि सरवर यांनी २०१३ मध्ये कानपुरातून पळ काढला. काही दिवस इकडच्या तिकडच्या नातेवाईकांकडे राहिले. घरची मंडळी रागाने बेभान झाली होती. मिळेल तेथे कापून काढू, अशी भाषा कानावर पडत असल्याने जीवाच्या धाकाने हे दोघे तीन वर्षांपूर्वी नागपुरात आले. मोमीनपुऱ्यातील टिमकी भागात त्यांनी एका इमारतीत भाड्याच्या खोलीत संसार थाटला. कपड्यांवर कलाकुसर करणारा सरवर सनकी तर, मनिषा तापट अन् एकलकोंड्या स्वभावाची होती. ती अलीकडे पतीशी थोड्याथोड्या कारणावरून वाद घालायची. त्यामुळे या दोघांमध्ये नेहमी खटके उडायचे. मात्र, ते शेजाऱ्यांकडे आपले कधीच गाऱ्हाणे मांडत नव्हते. कुणाशी फारसे बोलतही नव्हते. ते आणि त्यांच्यासोबतचा चिमुकला दादू एवढेच त्यांचे नागपुरातील विश्व! त्यामुळे शेजारची मंडळीही त्यांच्याकडे फारसे लक्ष देत नव्हती. ते दोघे भिन्न धर्मिय असावे, अशी खात्री एकूणच वर्तनातून बाजूच्यांना पटली होती. त्यांचे प्रेमप्रकरण असावे आणि जीवाच्या धाकाने ते बाहेरगावाहून पळून आले असावे, असाही तर्क शेजाऱ्यांनी काढला होता. तो खराही होता. (प्रतिनिधी)रजिस्टरवर उतरवल्या वेदनानिशा आणि सरवरने जातीधर्माच्या बेड्या तोडल्या होत्या. कुटुंबीयांचीही बंधने झुगारली होती. नागपुरात असे एकाकी जीवन जगण्यासाठी ते घरच्यांना दोष द्यायचे. त्यांच्याकडून होणारा त्रास किती क्लेषदायक आहे, ते एका रजिस्टरवर लिहायचे. घरच्यांमुळे आपले जगणे किती कठीण झाले, त्या वेदना हे दोघे शब्दबद्ध करीत होते. त्यांनी गेल्या तीन वर्षात आपल्या कुटुंबीयांकडून होणाऱ्या त्रासाची माहिती रजिस्टरच्या तब्बल ४० पानांवर उतरवली होती. नाहकच गेला दादूचा बळीया प्रकरणातील एक धक्कादायक बाब म्हणजे, दादू हा निशा आणि सरवरचा मुलगा नव्हे. तो निशाची कानपुरात राहणारी बहीण अनिताचा मुलगा आहे. निशाचा दादूवर खूप जीव होता. त्यामुळे घरून पळून येताना तिने दादूलाही सोबत आणले होते. प्रेमासाठी कडाडून होणारा विरोध सहन करणाऱ्या दोघांनी आपले घर, गाव, नातेवाईक सोडले. आता जगणे शक्य नसल्याचे लक्षात आल्याने जीवही सोडला. मात्र, निरागस दादूचा त्यांनी नाहक जीव घेतला. त्याचा कसलाही दोष नसताना तो या ‘अजब प्रेम की खतम कहानी‘चा बळी ठरला.