मागिल आठ दिवसापासून नागपुरात हिवळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात विरोधी पक्षांनी सरकारला जमीन घोटाळ्यावरुन घेरले आहे. तर, दुसरीकडे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना ओपन चॅलेंज दिले आहे, यावरुन आता पुन्हा आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
राज्यात भाजप सरकार आल्यानंतर एक नेते बारामतीमध्ये येऊन घड्याळाच करेक्ट कार्यक्रम करेन असं म्हटले. आता मला सांगा आमच बारामतीमध्ये काम आहे. खरच आमचा कार्यक्रम होणार आहे का? जर मी मनावर घेतले तर त्यांचाच करेक्ट कार्यक्रम करेन, असं चॅलेंज विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिले होते. यावर उत्तर देताना, भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले की, आम्ही निवडणुकीची वाट पाहत आहे. बारामतीचा विकास म्हणजे जनतेचा विकास नाही, पण नक्कीच त्यांना राजकारणातून सन्यास घ्यावा लागेल. यावर आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रत्युत्तर देत टीका केली आहे.
"अमृताशी बोला म्हणालात, पण तुम्ही सुनित्रा ताईंना..."; अजित पवारांच्या 'बॅटिंग'वर फडणवीसांची 'गुगली'
' मला हे ऐकल्यापासून झोप येत नाही. चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासारखा मोठा नेता आम्हाला चॅलेंज देतोय, याची आम्हाला भीती वाटत आहे. आता आम्ही राजकारणातून सन्यास घेणार आहे, असंही विरधी पक्षनेते अजित पवार म्हणाले.
'अजितदादांच्या तोंडी ही भाषा शोभत नाही'
चंद्रशेखर बानकुळे म्हणाले की, 'अजितदादांच्या तोंडी ही भाषा शोभत नाही. मला वाटलं होतं त्यांच्यात हिंमत आहे. मी एकच दौरा केला तर माझा करेकट कार्यक्रम करायला निघाले. पवार कुटुंबिांबाबात बारामतीत नाराजी आहे. येणाऱ्या निवडणुकांमध्ये जनता त्यांचाच करेक्ट कार्यक्रम करेल,' अशी टीका बावनकुळे यांनी केली.
ते पुढे म्हणाले, 'अजितदादा कधी रडतात तर कधी 8 दिवस फोन बंद करून पळून जातात. दादांना नेहमी क्रिम पोस्ट मिळत आल्या आहेत. उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री, विरोधीपक्ष नेते हे योग्य नाही. त्यांच्या जागी जयंत पाटील याना संधी मिळयला हवी होती,' असा टोला त्यांनी यावेळी लगावला. तसेच, 'ओबीसी आरक्षणाची फाईल अजितदादांनी फेकून दिली होती', असा आरोपही बावनकुळेंनी केला.