शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

अनिल देशमुखांच्या मुलाला घेऊन अजित पवार गडकरींना भेटले, राजकीय चर्चांना उधान

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2022 10:22 PM

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी शुक्रवारी नागपुरात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. यावेळी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मुलगा सलीलदेखील असल्याने विविध राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

नागपूर - एकीकडे महाविकास आघाडी व राज्यातील भाजप नेत्यांमध्ये वाद रंगला असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी शुक्रवारी नागपुरात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. यावेळी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मुलगा सलीलदेखील असल्याने विविध राजकीय चर्चांना उधाण आले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, शिवसेना नेते विविध निधीच्या वाटपावरून सातत्याने केंद्रावर टीका करत असतानाच, राज्यातील रस्त्यांसाठी केंद्रीय फंडातून निधी मिळावा, अशी मागणी यावेळी अजित पवार यांनी केली.

अजित पवार व दिलीप वळसे-पाटील यांचा सायंकाळच्या सुमारास पूर्व नागपुरात नियोजित कार्यक्रम होता. मात्र, त्याअगोदर ते गडकरी यांच्या निवासस्थानी गेले. सुमारे पाऊण तास त्यांची गडकरींशी वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा झाली. मागील वर्षी गडकरी यांनी महाराष्ट्राला केंद्रीय फंडातून चांगल्या प्रमाणात निधी दिला होता. या आर्थिक वर्षातदेखील तसाच निधी मिळाला तर राज्यातील अनेक रस्ते केंद्रीय निधीतून पूर्ण करता येतील, अशी भूमिका पवार यांनी मांडली. 

गडकरींच्या खात्याकडे रेल्वे ओव्हरब्रिज व रेल्वे अंडरब्रीज यासाठी काही निधी आहे. त्याची आम्हाला माहिती मिळाली होती. आम्ही दोघेही नागपुरात होतो व गडकरीदेखील नागपुरातच होते. त्यामुळे आम्ही लगेच त्यांची भेट घेतली. गडकरींनी यासंदर्भात राज्याच्या अखत्यारितील ज्या मार्गांवर रेल्वे ओव्हरब्रीज किंवा रेल्वे अंडरब्रीज आवश्यक आहे, त्यासाठी निधी देता येईल, असे सांगत आम्हाला यादीची मागणी केली, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

जीएसटीत सूट मिळावीयावेळी जीएसटीच्या मुद्द्यावरदेखील चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. राज्य शासनाचा जीएसटीचा जो हिस्सा आहे, त्यात सूट मिळावी. समृद्धी महामार्गाला रॉयल्टी माफ केली, तसा त्यातदेखील दिलासा द्या, अशी मागणी पवार यांनी केली. असे झाले तर केंद्र सरकारच्या निधीतून कामे करणे सोपे जाईल, अशी भूमिका पवार यांनी मांडली. पुण्यात रस्ते विकास महामंडळ रिंग रोड तयार करत आहे. त्या रिंगरोडमधील काही भाग ‘एनएचएआय’ करायला तयार आहे. त्यावरदेखील चर्चा झाली व गडकरींनी तसे अधिकाऱ्यांना निर्देश दिले, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

राजकीय चर्चांबाबत गुप्तता -सध्या विविध मुद्द्यांवरून राज्याचे राजकारण तापले आहे. अगदी नागपुरातील पोलीस भवनाच्या कार्यक्रमातदेखील भाजपच्या आमदारांनी बहिष्कार टाकला. या पार्श्वभूमीवर तिन्ही नेत्यांमध्ये राजकीय मुद्द्यांवरदेखील चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारDilip Walse Patilदिलीप वळसे पाटीलNitin Gadkariनितीन गडकरी