राज्यात मविआचेच सर्वाधिक सरपंच, अजितदादांनी थेट आकडाच सांगितला, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2022 12:20 PM2022-12-21T12:20:24+5:302022-12-21T12:21:03+5:30

आकडेवारीसह माहिती देताना त्यांनी सांगितले की,  ग्राम पंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीचे ३२५८ सरपंच निवडूण आले.

ajit pawar said maha vikas aghadi has the highest number of sarpanchs in the state | राज्यात मविआचेच सर्वाधिक सरपंच, अजितदादांनी थेट आकडाच सांगितला, म्हणाले...

राज्यात मविआचेच सर्वाधिक सरपंच, अजितदादांनी थेट आकडाच सांगितला, म्हणाले...

googlenewsNext

नागपूर: ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वाधिक जागा भाजप-शिंदे गटाला मिळाल्याचा दावा खोटा असून महाविकास आघाडीच्या बाजून जनतेने कौल दिल्याचा दावा विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी आज केला. 

आकडेवारीसह माहिती देताना त्यांनी सांगितले की,  ग्राम पंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीचे ३२५८ सरपंच निवडून आले. तर भाजप- शिंदे गटाला ३०१३ सरपंच मिळाले. इतर पक्षाला १३६१ पद मिळाले. यातही ७६१ सरपंच हे महाविकास आघाडीचे आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे ४०१९ सरपंच निवडूण आल्याचा दावा पवार यांनी केला. यामुळे जनतेचा कौल महाविकास आघाडीच्या बाजूने असल्याचे ते म्हणाले. यावेळी विरोधकांकडून पेढेही वाढण्यात आले. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, जयंत पाटील, दिलीप वळसे- पाटील, भाई जगताप, सचिन अहीर, अबू आझमी आदी उपस्थित होते.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: ajit pawar said maha vikas aghadi has the highest number of sarpanchs in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.