कमलेश वानखेडे, नागपूरनागपूर : सध्या आजित पवार हे अरोरा नावाचा कन्सल्टन्ट जे सांगतो तसे बोलत आहेत. मूळ स्वभाव दाखविण्यास त्यांना बंदी केली आहे. माझा अनुभव आहे आहे की हे खरे अजितदादा नाहीत. दादा महाराष्ट्राला माहीत आहे. काही सल्लागार परिचित आहे. त्यांचा सांगण्यावरून ते बोलत आहे. दादा एकदा बोलले की बोलले ते कृती माग घेत नाहीत, असे चिमटे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार यांनी काढले.
पक्षातर्फे भंडारा- गोंदिया येथे आयोजित शिवस्वराज यात्रेत सहभागी होण्यासाठी मंगळवारी नागपुरात आले असता जयंत पाटील यांनी पत्राकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, पक्षाकडे अनेक युवा चेहरे तिकीट मागत आहेत. यातील बहुतेकांनी पक्षात काम केले आहे. यात उभे राहिले तर निवडून येऊ शकतात, अशांना संधी दिली जाईल. नागपुरातही काही मतदारसंघांची मागणी केली आहे. महाविकास आघाडीचे जागा वाटप लवकरच होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले भाग्यश्री आत्राम यांनी निवडणूक लढविण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. १२ तारखेला त्यांची भेट होऊन चर्चा होईल, असेही त्यांनी सांगितले.