अजित पवारांचा निर्णय हताशेतून : मुनगंटीवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 11:35 PM2019-09-27T23:35:13+5:302019-09-27T23:36:18+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा नेमका का दिला हे तेच सांगू शकतील. परंतु हताशा व निराशेतून त्यांनी हा निर्णय घेतला असावा असे प्रतिपादन राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी वरील वक्तव्य केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा नेमका का दिला हे तेच सांगू शकतील. परंतु हताशा व निराशेतून त्यांनी हा निर्णय घेतला असावा असे प्रतिपादन राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी वरील वक्तव्य केले.
दरम्यान शुक्रवारी सकाळच्या सुमारास केंद्रीय कोळसा, खाण व संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबागस्थित डॉ.हेडगेवार स्मृति भवन परिसराला भेट दिली. त्यांच्यासमवेत मुनगंटीवार हेदेखील होते.यावेळी मुनगंटीवार यांनी शरद पवारांवरील कारवाईसंदर्भात भाष्य केले. सरकारकडून बदल्याच्या भावनेने कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. निवडणुका तोंडावर असल्यामुळे कारवाई करण्यात येत असल्याचे विरोधकांचे आरोप तथ्यहीन आहेत. उच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतर ‘ईडी’ने प्रकरण नोंदविले आहे. यात कुठलेही राजकारण नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.