नागपूर : अजनी येथील रेल्वे ओव्हरब्रीज १९२७ मध्ये इंग्रजांनी तयार केला. या पुलाला ८८ वर्षे पूर्ण झाली आहेत. पाच ते सहा वर्षापूर्वी इंग्रजांनी रेल्वेला पत्र लिहून अजनीच्या पुलाचे आयुष्य संपल्याची बाब निदर्शनास आणून दिली. परंतु तरीसुद्धा हा पुल नव्याने तयार करण्यासंदर्भात कोणतेच पाऊल उचलण्यात आले नाही. तत्कालीन रेल्वे राज्यमंत्री अधीर रंजन चौधरी यांनी अजनी रेल्वे पुलाची पाहणी करून हा पूल नव्याने तयार करण्याचा प्रस्ताव सादर करण्याची सूचना केली होती. परंतु त्यावर अद्याप काहीही उपाययोजना करण्यात आली नाही.(प्रतिनिधी)
अजनी पुलाचे आयुष्य संपले
By admin | Published: August 05, 2016 3:11 AM