शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
3
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
4
सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
5
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
6
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
7
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
8
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
9
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
10
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
11
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
12
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
13
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
14
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
15
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
16
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
17
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
18
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
19
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
20
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?

अजनीतील ‘खून का बदला’ संतापजनक अन् लज्जास्पदही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 4:07 AM

--------------- जमावाचा रोष, त्याला आडवा केला --------------- पोलीस कुठे होते, शोधाशोध करूनही का नाही दिसला ...? नरेश डोंगरे । ...

---------------

जमावाचा रोष, त्याला आडवा केला

---------------

पोलीस कुठे होते, शोधाशोध करूनही का नाही दिसला ...?

नरेश डोंगरे ।

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : अवैध धंदे करणाऱ्या गुंडांना एक तरुण विरोध करतो म्हणून ते गुंड त्या तरुणाची निर्घृण हत्या करतात. यानंतर लोकभावना तीव्र होतात. काही तासांपूर्वीच हत्या करणारा गुंड सिनेमातील खलनायकासारखा निर्ढावलेपणाने वस्तीत पोहोचतो अन् वस्तीतील संतप्त जमाव त्याला हातात मिळेल त्या विटा, दगडाने, दांडक्याने ठेचून टाकतात. गुंडांची क्रूरता, त्यांचा निर्ढावलेपणा, लोकांचा संताप अन् सुटलेला धीर तसेच पोलिसांचा नेभळटपणा उजेडात आणणारी ही घटना शनिवारी सकाळी नागपुरातील अजनीत घडली. या घटनेमुळे समाजमन ढवळून निघाले आहे.

खर्रा दिला नाही, दारू प्यायला पैसे दिले नाही, रागावून बघितले, इतक्या क्षुल्लक कारणावरून नागपुरात हत्येच्या घटना घडतात. अपहरण करून हत्या करण्याचे, गुंडांच्या आपसी वैमनस्यातून, जमिनीच्या वादातून आणि घरगुती वादातून हत्या होण्याचे प्रकार सर्वत्र घडतात. नागपुरातही ते घडायचे. मात्र, यापूर्वीचे पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय आणि सध्या कार्यरत असलेले पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी धडाकेबाज ॲक्शन प्लॅन तयार केला. त्यानुसार, नागपुरातील सर्वच मोठ्या गुन्हेगारी टोळ्यांचे म्होरके आणि त्यांच्या इशाऱ्यावर गुन्हे करणाऱ्या गुंडांवर मकोका, एमपीडीएसारखी कडक कारवाई करून त्यांना कारागृहात डांबले आहे. काहींना हद्दपार करून शहरातून पिटाळून लावले आहे. असे असूनही नागपुरात गल्लीबोळात रोज नवनवीन गुंड तयार होत असतानाचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. दारूचे गुत्ते, मटक्याचे अड्डे, जुगार अड्डे चालवून, छोट्या दुकानदारांकडून हप्ता वसुली करून हे गुंड पैसे मिळवतात अन् नंतर परिसरातील महिला-मुलींच नाही तर विरोध करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरतात. कुणी विरोध केल्यास त्याला भरवस्तीत मारले जाते. आपली दहशत निर्माण व्हावी अन् नंतर कुणी विरोध करू नये, असा उद्देश त्यामागे असतो. स्वत:ला शक्तिमान म्हणवून घेणारा अजनीतील शिवम गुरूदेव नामक अवघ्या १९ वर्षांचा गुंडही असाच करीत होता. त्याला विरोध करणाऱ्या स्वयंदीप नगराळे नामक तरुणाची त्याने शुक्रवारी रात्री हत्या केली. हत्या केल्यानंतर त्याने त्या भागातील नागरिकांना यापुढे विरोध केल्यास असेच हाल करेन, अशी धमकीही दिली. त्याच्या निर्ढावलेपणाचा कळस म्हणजे, हत्या करून आठ तास होत नाही तोच तो वस्तीत परतला. त्याचा तो निर्ढावलेपणा कुणाच्याही तळपायाची आग मस्तकात नेणारा होता. झालेही तसेच. निरागस स्वयंदीपच्या हत्येने शोकविव्हळ झालेल्या परिसरातील जमावाने शक्तिमानवर झडप घातली अन् तेवढ्याच निर्दयपणे त्याला दगड, धोंडे, विटा, दांडक्याने ठेचून काढले.

----

टळला असता गुन्हा

अवघ्या दहा तासांत एकाच वस्तीत दोनवेळा थरार घडला. यातून पोलिसांचा नेभळटपणा धडधडीतपणे पुढे आला. सोबतच अनेक प्रश्नही

रात्री स्वयंदीपची हत्या केल्यानंतर पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी धावपळ केली असेल तर त्यांना शक्तिमान का सापडला नाही. आरोपी शक्तिमान त्याच्या मामाच्या भांडेप्लॉटमधील घरी जाऊन लपला. पोलिसांना ते का कळले नाही? असाही प्रश्न आहे. हत्येच्या घटनेनंतर परिसरात बंदोबस्त लावण्यात आला होता. सकाळी जेव्हा तो गुंड काैशल्यानगरात पोहोचला तर पोलिसांना का दिसला नाही. पोलिसांनी त्याला शोधून त्याच्या वेळीच मुसक्या बांधल्या असत्या तर ही घटना टाळता आली असती.

----

अक्कू, ईकबाल अन् शक्तिमान

अनेक महिला-मुलींची अब्रू लुटणारा जरीपटक्यातील कुख्यात गुंड अक्कू यादवची कस्तुरबानगरातील महिला-पुरुषांनी १३ ऑगस्ट २००४ला न्यायमंदिर परिसरात निर्घृण हत्या केली होती. वसंतराव नाईक झोपडपट्टी, सीताबर्डी येथे राहणाऱ्या कोणत्याही कुटुंबातील महिला-मुलगी मनात येईल तेव्हा उचलून नेणाऱ्या कुख्यात भुरू गँगचा गुंड ईकबाल शेख याची ऑक्टोबर २०१२ मध्ये संतप्त जमावाने अशीच हत्या केली होती. आता शक्तिमान नामक गुंडाबाबत असेच झाले. लोकांनी या गुंडांना ठेचून टाकणे, म्हणजे जनतेने केलेला ताबडतोब फैसला ठरतो. मात्र, पोलिसांसाठी हा फैसला लज्जास्पद ठरला आहे.

------