शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
3
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
4
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
5
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
6
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
7
डायलॉग, टाळ्या, शिट्ट्या आणि पैसा वसूल! कसा आहे शरद केळकरचा ‘रानटी’? वाचा Review
8
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
9
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
10
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
11
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
12
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
13
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
14
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
15
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
16
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
17
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
18
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
19
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
20
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन

अखिल कुणबी समाजाने जाळली मनुस्मृती

By admin | Published: April 01, 2016 3:27 AM

महाल चिटणवीसपुरा येथील कुणबी समाजभवनापुढे अखिल कुणबी समाजाच्या कार्यकर्त्यांनी सार्थ श्री मनुस्मृती पुस्तकाच्या फोटो कॉपी जाळून आपला संताप व्यक्त केला.

नागपूर : महाल चिटणवीसपुरा येथील कुणबी समाजभवनापुढे अखिल कुणबी समाजाच्या कार्यकर्त्यांनी सार्थ श्री मनुस्मृती पुस्तकाच्या फोटो कॉपी जाळून आपला संताप व्यक्त केला. अखिल कुणबी समाजाचे सचिव अशोक वानखेडे यांच्या अध्यक्षस्थानी आणि माजी आमदार दीनानाथ पडोळे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. या पुस्तकात तेली, कुणबी, कलार, कलाल, सोनार, माळी, चांभार आदी समाजाबाबत आणि महिलांबाबत हीन लिखाण करण्यात आले आहे. महाराष्ट्र सरकारने २० वर्षांपूर्वी या पुस्तकावर बंदी आणली असतानाही या पुस्तकाचे भाषांतर करून नव्याने प्रकाशन करण्यात आले. संत तुकाराम महाराज आणि त्यांच्या समकालीन संतांनी व समाजसुधारकांनी मनुवादाला विरोध केला होता, मनुस्मृतीतील जाती व्यवस्थेला नाकारले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा मनुवादाला कट्टर विरोध करून आधुनिक समाज निर्माण करून सर्वधर्मसमभावाची संकल्पना मांडली होती. या सर्वांच्या विचारांना अप्रत्यक्षरीत्या विरोध करण्याचे कार्य या पुस्तकाच्या प्रकाशनामुळे होत आहे. विविध समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, असे मत या वेळी व्यक्त करून मनुस्मृतीचा निषेध करण्यात आला. कुणबी सेवा संघ, कुणबी युवा मंच आणि अखिल कुणबी समाजाद्वारे या पुस्तकाच्या फोटो कॉपी जाळण्यात आल्या. या पुस्तकावर त्वरित बंदी आणल्या गेली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कुणबी सेवा संघाचे अध्यक्ष पंकज पांडे यांनी दिला.या आंदोलनात राजू भेंडे, राज तिजारे, चेतन वडे, संदीप भोयर, राजेश काकडे, बाळाभाऊ शिंगणे, नितीन मालोदे, भास्कर टाले, अ‍ॅड. कीर्तीकुमार कडू, कपील कुहिटे, राजू खडसे, राज वानखेडे, पिंटू नखाते, पंकज पांगुळे, लाभेश ढोक यांचा समावेश होता. (प्रतिनिधी)