मोरेश्वर मानापुरे, नागपूर: इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाच्या पश्चिम विभागांतर्गत कार्यरत नागपूर सीए संस्थेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून अध्यक्षपदी सीए अक्षय व्ही. गुल्हाने यांची २०२४-२५ या वर्षासाठी एकमताने निवड करण्यात आली.
नवीन कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्ष सीए दिनेश राठी, सचिव सीए स्वरूपा वझलवार, कोषाध्यक्ष सीए दीपक जेठवानी, डब्ल्यूआयसीएएसएच्या अध्यक्षपदी सीए तृप्ती भट्टड यांचा समावेश आहे. व्यवस्थापकीय समिती सदस्यांमध्ये माजी अध्यक्ष सीए संजय एम. अग्रवाल, सीए जितेंद्र सागलानी, सीए संजय सी. अग्रवाल, अजय वासवानी व्यवस्थापकीय समिती सदस्य आणि पदसिद्ध सदस्य म्हणून सीए अभिजित केळकर यांची निवड करण्यात आली.
सीए अक्षय गुल्हाने म्हणाले, वर्षभरात ज्ञानवर्धन कार्यक्रमांच्या आयोजनावर भर राहील. त्याद्वारे राष्ट्र उभारणीत सदस्यांना आपली भूमिका बजावता येईल. विविध सरकारी आणि निमशासकीय कार्यालय आणि विभागांशी अधिक संवाद साधण्यावर भर राहील. वरिष्ठ आणि तरुण सदस्यांना अनुकूल आणि मैत्रीपूर्ण वातावरणात ज्ञानाची देवाणघेवाण करण्यासाठी एक व्यासपीठ निर्माण करण्यासाठी शाखा महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल.
शाखा वर्षभरात व्यावसायिक समुदायाच्या सर्वांगीण विकासासाठी तरुण सदस्यांच्या उत्साहासह ज्येष्ठ सदस्यांच्या अनुभवाची सांगड घालणारे उपक्रम घेईल. वर्षभरात ‘नेस्ट’ अर्थात एन- नेटवर्किंग, ई- उद्योजकता, एस- मानके आणि नीतिशास्त्र, टी- तंत्रज्ञान, यावर भर राहील. एका तरुण नेतृत्त्वावर विश्वास ठेवल्याबद्दल त्यांनी सर्व सदस्य आणि शाखेला निरंतर मार्गदर्शन करणारे सीए अशोक चांडक आणि सीए जयदीप शाह यांचे आभार मानले. नागपूर शाखेला प्रगतीच्या सर्वोच्च शिखरावर नेण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.