शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
4
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
5
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
6
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
7
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
8
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
9
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
10
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
11
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
12
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
13
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
14
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
15
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
16
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
17
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
18
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
19
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
20
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात

नागपुरात जय भवानी, जय शिवाजीच्या गजरात छत्रपतींचा राज्याभिषेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 7:16 PM

भगवे तोरण, भगवे ध्वज, भगवा दुपट्टा घातलेल्या युवक-युवती. ढोलताशांचा गजर. सर्वांच्या मुखातून जय भवानी, जय शिवाजीचा गजर. महाराष्ट्रातील ३३ किल्ल्यांवरून आणलेली माती आणि पाण्याने शिवाजी महाराजांचा जलाभिषेक करण्यात आला. बालक, युवक, महिला आणि हजारो शिवप्रेमींच्या उपस्थितीत महालच्या शिवाजी महाराज चौकात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा थाटात संपन्न झाला.

ठळक मुद्देशिवाजी पुतळ्याजवळ रंगला सोहळा : तलवारबाजी, दांयपट्टा अन् लाठीकाठीची चित्तथरारक प्रात्यक्षिके

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भगवे तोरण, भगवे ध्वज, भगवा दुपट्टा घातलेल्या युवक-युवती. ढोलताशांचा गजर. सर्वांच्या मुखातून जय भवानी, जय शिवाजीचा गजर. महाराष्ट्रातील ३३ किल्ल्यांवरून आणलेली माती आणि पाण्याने शिवाजी महाराजांचा जलाभिषेक करण्यात आला. बालक, युवक, महिला आणि हजारो शिवप्रेमींच्या उपस्थितीत महालच्या शिवाजी महाराज चौकात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा थाटात संपन्न झाला. 

सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून महापौर नंदा जिचकार, मुधोजी राजे भोसले, शिवाजी महाराजांच्या सरदारात मानाचे स्थान असलेले येसाजी कंक यांचे वंशज रवींद्र कंक उपस्थित होते. मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून अभिषेक केला. श्री शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या सहा सदस्यांचे लग्न झाल्यामुळे त्यांना सपत्नीक अभिषेक करण्याचा मान देण्यात आला. राज्याभिषेक सोहळ्यासाठी श्री शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे सदस्य विशाल देवकर, अभिषेक सावरकर यांनी मोटरसायकलने प्रवास करून ३६ किल्ल्यांवरील माती आणि पाणी खास राज्याभिषेक सोहळ्यासाठी आणले होते. माती व पवित्र पाणी यांचा जलाभिषेक यावेळी करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते आरती केल्यानंतर शिवकालीन क्रीडा, प्रात्यक्षिकाला सुरुवात झाली.   
                            भगवा दुपट्टा घातलेल्या युवक-युवतींनी ढोलताशांच्या निनादात भगवा नाचविला. त्यानंतर युवक-युवतींनी तलवारबाजी, दांडपट्टा अन् लाठीकाठीची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फेडले. प्रात्यक्षिके सुरू असताना ड्रोनद्वारे या समारंभावर पुष्पवर्षाव करण्यात येत होता. राज्याभिषेक सोहळ्याचा विधी गोविंद शास्त्री पडगावकर यांनी पार पाडला. यशस्वीतेसाठी श्री शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे दत्ता शिर्के, प्रवीण घरजाळे, जय आसकर, पंकज धुर्वे, पंकज पराते, रूपेश चकोले, नीतेश बडवाईक, रितेश गाढवे, विजू राजूरकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.रायगड, प्रतापगड अन् शिवनेरी किल्ला पाहण्यासाठी गर्दीराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने सोहळ्याच्या ठिकाणी रायगड, प्रतापगड आणि शिवनेरी किल्ल्याची प्रतिकृती हुबेहुब साकारण्यात आली होती. हे किल्ले पाहण्यासाठी शिवप्रेमींनी एकच गर्दी केली. राज्याभिषेकासाठी तयार केलेला ८ फुटांचा जिरेटोपही येथे ठेवण्यात आला होता, तर शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराला शिवप्रेमींनी प्रतिसाद दिला.

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजMahalमहाल