संजय महाकाळकर : विरोधी पक्षनेते पदाची सूत्रे स्वीकारली नागपूर : काँग्रेसच्या सर्व २९ नगरसेवकांचे प्रभागात काम आहे. म्हणूनच सर्व निवडून आलेले आहेत. त्यामुळे महापालिकेच्या कामकाजाचे एका कुणाला ज्ञान असून काहीच कळत नाही, असा दावा कुणी करू नये, काँग्रेसचे सर्वक्ष नगरसेवक सक्षम असल्याचे प्रतिपादन विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर यांनी बुधवारी केले. महापालिका मुख्यालयातील विरोधी पक्षनेते यांच्या कक्षात माजी विरोधी पक्षनेते विकास ठाकरे यांच्याकडून पदभार स्वीकारल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महापालिकेत काँग्रेस सक्षमपणे विरोधीपक्षाची भूमिका बजावणार आहे. सर्वांना विश्वासात घेऊ न जनतेच्या प्रश्नाला सभागृहात न्याय देण्याचा प्रयत्न करू , पक्षाच्या विरोधात भूमिका घेणाऱ्यांची शहर काँग्रेस कमिटीकडे तक्रार करण्यात येईल, असा इशाराही महाकाळकर यांनी दिला. यावेळी काँग्रेसचे नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पदग्रहणाच्यावेळी ताशांच्या गजरात कार्यक र्त्यानी एकच जल्लोष केल्याने महापालिका कार्यालयाचा परिसर दणाणून गेला होता.(प्रतिनिधी) मुंबईच्या धर्तीवर उपलोकायुक्त नेमा नागपूर महापालिकेचा कारभार पारर्दी व्हावा, यासाठी मुंबईच्या धर्तीवर नागपुरातही उपलोकायुक्तांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी करीत महापालिका सभागृहात विरोधीपक्षाची भूमिका प्रभावीपणे मांडणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गुडधे, सहारे यांची अनुपस्थिती संजय महाकाळकर यांच्या पदग्रहण समारंभाला काँग्रेसचे ज्येष्ठनगरसेवक संदीप सहारे, प्र्रफुल्ल गुडधे, तानाजी वनवे व बंटी शेळके यासारख्या प्रमुख नगरसेवकांसह इतर काहींची अनुपस्थिती होती. काँग्रेसमधील गटबाजीतून काही नगरसेवक या कार्यक्रमाला अनुपस्थित असल्याची चर्चा होती.
काँग्रेसचे सर्वच नगरसेवक सक्षम
By admin | Published: March 09, 2017 2:35 AM