लाेकमत न्यूज नेटवर्क
कन्हान : घरी कुणाचेही लक्ष नसताना चाेरट्याने आत प्रवेश केला आणि कपाटातील राेख रकमेसह साेन्याचे दागिने चाेरून नेले. यात चाेरट्याने २ लाख ७६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चाेरून नेला. ही घटना कन्हान (ता. पारशिवनी) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील बाेरी सिंगाेरी येथे शनिवारी (दि. २७) दुपारी २.४५ ते सायंकाळी ४.३० वाजताच्या दरम्यान घडली.
विनायक मागाेजी येरणे (५५, रा. बाेरी सिंगाेरी, ता. पारशिवनी) यांचे कुटुंबीय शनिवारी दुपारी घरीच हाेते. ते कामात व्यस्त असताना अज्ञात चाेरट्याने उघड्या दारातून घरात प्रवेश केला. त्याने घरातील खाेलीत ठेवलेले दाेन कपाट उघडून हुडकले आणि कपाटांमधील राेख रकमेसह साेन्याचे दागिने चाेरून नेले.
चाेरीला गेलेल्या मुद्देमालामध्ये ७२ हजार रुपये राेख, ३७ हजार रुपयाची साेन्याची चेन, १५ हजार रुपयाची साेन्याची अंगठी, नऊ हजार रुपयाचे कानातील साेन्याचे टाॅप्स, नऊ हजार रुपयाची साेन्याची वेल, नऊ हजार रुपयाची साेन्याची नथ, नऊ हजार रुपयाची साेन्याची अंगठी, १३ हजार रुपयाची साेन्याची गळसाेई, ९० हजार रुपयाचा साेन्याची चफला कंठीमाळ तसेच १३ हजार रुपयाची साेन्याची अंगठी या दागिन्यांचा समावेश असल्याची माहिती विनायक येरणे यांनी पाेलिसांना दिली.
दाेन्ही कपाट उघडे दिसल्याने त्यांना घरी चाेरी झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी लगेच पाेलिसात तक्रार दाखल केली. याप्रकरणी कन्हान पाेलिसांनी अज्ञात चाेरट्याविरुद्ध भादंवि ३८० अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास पाेलीस उपनिरीक्षक महादेव सुरजुसे करीत आहेत.