नरेश डोंगरेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पोलीस दलाला हादरवून सोडणाऱ्या कोरोनाने गुन्हे शाखेतही शिरकाव केला आहे. शहरातील गुन्हे शाखेच्या 'कमांडर'सह पाचही युनिटमधील कर्मचारी, अधिकारी कोरोनाने बाधित झाल्यामुळे पोलिसांच्या कामकाजावर विपरीत परिणाम झाला आहे.
शहर पोलीस दलात गुन्हे शाखेची महत्त्वाची भूमिका असते. गुन्हे होऊ नये यासाठी सराईत गुन्हेगारांवर लक्ष ठेवणे, त्यांची धरपकड करून त्यांना कोठडीत डांबणे, झालेल्या गुन्ह्यांचा छडा लावून गुन्हेगारांना अटक करणे आणि रखडलेल्या विविध पोलीस ठाण्यातील तपासात मदत करणे आदी जबाबदाºया गुन्हे शाखेवर असतात. शहर पोलीस दलात गुन्हे शाखेचे पाच युनिट आहेत. या पाचही युनिटमध्ये कोरोनाने शिरकाव केला. गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. नीलेश भरणे यांच्यासह प्रत्येक युनिटमधील पोलीस बाधित झालेले आहे. त्यामुळे गुन्हे शाखेच्या पाचही युनिटच्या कामकाजावर विपरीत परिणाम झाला असून डिटेक्शन तसेच गुन्हेगारांची धरपकड थांबली आहे.
असा आला कोरोनावेगवेगळ्या गुन्ह्यातील आरोपींना पकडून त्यांची चौकशी केल्यामुळे गुन्हे शाखेच्या पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. गुन्हेगारांना पकडताना तो कोरोनाबाधित आहे की नाही, ते समजून येत नाही. त्यामुळे बाधित आरोपीच्या माध्यमातून कोरोना धडधाकट पोलिसांना विळखा घालत आहे. गेल्या दोन आठवड्यात गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त, काही वरिष्ठ पोलीस निरीक्षक तसेच २८ पोलीस कर्मचारी कोरोनामुळे बाधित झाले आहेत. त्यामुळे गुन्हे शाखेच्या धडाकेबाज कार्यपद्धतीवर अंकुश बसला आहे.असे आहे बाधितयुनिट १ - ७,
युनिट २ - ३,
युनिट ३ - ९,
युनिट ४ - ३
युनिट ५ - ६वाहतूक शाखेतही अडसरकोरोनाने वाहतूक शाखेतील अधिकारी कर्मचाऱ्यांसह एकूण २६ जणांना बाधित केले आहे. त्यामुळे पोलिसांच्या वाहतूक शाखेच्या कामकाजात अडसर निर्माण झाला असून कामाची गतीही मंदावली आहे. विशेष म्हणजे, शहर पोलीस दलातील एकूण ६७६ जणांना आजपर्यंत कोरोनाची बाधा झाली आहे.