अ.भा. काँग्रेस समितीवर घारड, तायवाडे, भोयर, राऊत, सपकाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 11:48 PM2018-03-20T23:48:41+5:302018-03-20T23:49:06+5:30
प्रदेश काँग्रेसने नागपुरातील दुसऱ्या फळीतील नेत्यांना प्रमोशन दिले आहे. प्रदेश प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आलेले अनंतराव घारड, बबनराव तायवाडे, सुरेश भोयर, कुंदा राऊत व अभिजित सपकाळ यांना अखिल भारतीय काँग्रेस समितीवर प्रतिनिधी म्हणून पाठविण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रदेश काँग्रेसने नागपुरातील दुसऱ्या फळीतील नेत्यांना प्रमोशन दिले आहे. प्रदेश प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आलेले अनंतराव घारड, बबनराव तायवाडे, सुरेश भोयर, कुंदा राऊत व अभिजित सपकाळ यांना अखिल भारतीय काँग्रेस समितीवर प्रतिनिधी म्हणून पाठविण्यात आले आहे. विशेष म्हणजे दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या अधिवेशनात हे नेते अ.भा. काँग्रेस समितीच्या पासवर सहभागी झाले होते.
नागपूर शहरात पक्षाच्या संघटनात्मक निवडणुका झाल्या नाहीत. त्यामुळे नागपुरातील नेत्यांना इतर जिल्ह्यातील ब्लॉकमधून प्रदेश प्रतिनिधी म्हणून निवडण्यात आले होते. यात अ.भा. काँग्रेस समितीचे महासचिव अविनाश पांडे, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांच्यासह अनंतराव घारड, डॉ. बबनराव तायवाडे, अभिजित सपकाळ आदींचा समावेश होता. तर नागपूर ग्रामीणमधून महासचिव मुकुल वासनिक, कुंदा राऊत, सुरेश भोयर आदींची प्रदेश प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. प्रदेश प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आलेल्या सदस्यांपैकी निवडक नावे अ.भा. काँग्रेस समितीवर पाठविली जातात. पक्षातर्फे अ.भा. काँग्रेस समितीचे महासचिव मुकुल वासनिक, महासचिव अविनाश पांडे, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार या ज्येष्ठ नेत्यांना अपेक्षेनुसार अ.भा. काँग्रेस समितीवर प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. विशेष म्हणजे माजी मंत्री अनिस अहमद यांनाप्रदेश काँग्रेसवर स्वीकृत सदस्य म्हणून स्थान देण्यात आले व त्यांचीही अ.भा. काँग्रेस समितीवर प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
पक्षातर्फे एकीकडे ज्येष्ठ नेत्यांचा सन्मान राखण्यात आला तर दुसरीकडे पक्षासाठी झटणाºया दुसºया फळीतील व युवा नेत्यांनाही संधी देण्यात आली आहे. अनंतराव घारड व डॉ. बबनराव तायवाडे यांना केंद्रात संधी देऊन चव्हाण यांनी निष्ठेचे बक्षीस दिले आहे. प्रदेश काँग्रेसच्या डिजिटल सेलचे अध्यक्ष असलेले अभिजित सपकाळ, रामटेक लोकसभा युवक काँग्रेसच्या माजी अध्यक्ष कुंदा राऊत व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश भोयर यांनाही केंद्रीय समितीवर प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. राऊत व भोयर यांच्या नियुक्तीत प्रदेश काँग्रेससह मुकुल वासनिक यांचीही महत्त्वाची भूमिका असल्याची माहिती आहे.
विरोधी गटाला संधी नाही
- प्रदेश काँग्रेसमधून अ.भा. काँग्रेस समितीवर प्रतिनिधी म्हणून पाठविण्यात आलेले दुसºया फळीतील सर्वच नेते हे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या विश्वासातील आहेत. चव्हाण यांनी आपल्या खंदे समर्थकांनाच दिल्लीत पाठविल्याचे यावरून स्पष्ट होते. विरोधात दंड थोपटणाºया गटाला सपशेल दूर सारण्यात आले आहे. यामुळे विरोधी गटातील नेत्यांची नाराजी आणखीनच वाढली आहे.