लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभा निवडणुकीची रविवारी आचारसंहिता लागू झाली. यानंतर आचारसंहितेची तात्काळ अंमलबजावणी नागपूरच्या महापौर नंदा जिचकार यांनी केल्याचे दिसून आले. आचारसंहिता जाहीर झाल्याचे समजल्यानंतर जिचकार यांनी महापालिकेची गाडी परत केली. यानंतर मुख्यालयातून त्या दुचाकीने परत गेल्या.निवडणूक आयोगाने आज लोकसभेच्या निवडणुकीची तारीख जाहीर केली. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर तात्काळ आचारसंहिता देखील लागू करण्यात आली. यामुळे जिचकार यांनी त्या वापरत असलेली महापालिकेची शासकीय गाडी परत केली. तसेच उपमहापौर दीपराज पार्डीकर व स्थायी समितीचे अध्यक्ष प्रदीप पोहाणे, परिवहन समितीचे सभापती बंटी कुकडे यांच्यासह सभापतींनी वापरत असलेल्या महापालिकेच्या गाड्या परत केल्या.
नागपूरच्या महापौरांसह पदाधिकाऱ्यांच्या गाड्या परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 9:49 AM
लोकसभा निवडणुकीची रविवारी आचारसंहिता लागू झाली. यानंतर आचारसंहितेची तात्काळ अंमलबजावणी नागपूरच्या महापौर नंदा जिचकार यांनी केल्याचे दिसून आले.
ठळक मुद्देदुचाकीने केला प्रवास