आॅनलाईन लोकमतनागपूर : ग्रामीण व शहरी भागातील प्रमुख रस्त्यावरील खड्ड्यामुळे जनतेला होणारा त्रास कमी करण्यासाठी संपूर्ण रस्ते १५ डिसेंबरपूर्वी खड्डेमुक्त करा. त्यासाठी कालबध्द कार्यक्रम तयार करून त्याचा दैनंदिन अहवाल सादर करा, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिल्यात.राजीव गांधी बौध्दिक संपदा संस्थेच्या सभागृहात नागपूर विभागातील रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासंदर्भात वरिष्ठ अधिकºयांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.जनतेला दळणवळणासाठी चांगले रस्ते देण्याच्या योजनेंतर्गत खड्डेमुक्त रस्ते हा उपक्रम राज्यात राबविण्यात येत असल्याचे सांगताना सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, सर्व कामे अतिशय गुणवत्तापूर्ण व नियोजित कालावधीत पूर्ण करण्यात यावीत. १५ डिसेंबरपूर्वी आपल्या कार्यक्षेत्रातील शंभर टक्के खड्डेमुक्त रस्ते करणाºया अधिकाºयांचा सन्मान करण्यात येईल. खड्डेमुक्त रस्ते या उपक्रमाला अधिकाºयांचा चांगला सहभाग मिळत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.नागपूर प्रादेशिक विभागातील विविध कामांचा आढावा घेऊन दैनंदिन येणाºया अडचणी संदर्भातही अधिकाºयांना मार्गदर्शन केले. बांधकामा संदर्भात असलेले उद्दिष्ट दिलेल्या कालावधीत पूर्ण करावे, अशा सूचनाही यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिल्यात.प्रारंभी नागपूर प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता उल्हास देबडवार यांनी विभागातील खड्डेमुक्त रस्त्यांच्या कामासंदर्भात केलेल्या नियोजनबध्द आराखड्याची माहिती दिली. अधीक्षक अभियंता प्रशांत नवघरे यांनी नागपूर सर्कलमध्ये सुरू असलेल्या कामांची माहिती दिली. कार्यकारी अभियंता संजय इंदूरकर, मिलिंद बांधवकर, जनार्दन भानुसे आदींनी रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासंदर्भात सुरु असलेल्या कामाबाबतचा अहवाल सादर केला. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपसचिव फू.स. मेश्राम उपस्थित होते.आधुनिक तंत्राचा वापरसार्वजनिक बांधकाम विभागामध्ये रस्ते बांधकामासह सर्वच विकास कामांमध्ये आधुनिक तंत्राच्या वापराची कार्यप्रणाली स्वीकारण्यात आली आहे. ही प्रणाली सर्वच ठिकाणी अधिक कार्यक्षमपणे वापरण्याबाबत अधिकाºयांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.