शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

नागपूरच्या बहुचर्चित हसनबाग तिहेरी खुनातील सर्व सातही आरोपी निर्दोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2017 7:18 PM

 नागपूर : नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत हसनबाग भागात स्कॉर्पिओ वारंवार अंगावर घालून तिघांचे खून केल्याचा आरोप असलेल्या सात आरोपींची मोक्का विशेष न्यायालयाचे न्यायाधीश शेखर मुनघाटे यांच्या न्यायालयाने सबळ पुराव्यांच्या अभावी संशयाचा लाभ देत निर्दोष सुटका केली.जगदीश विठ्ठल कोसूरकर, दिलीप विठ्ठल कोसूरकर दोन्ही रा. छापरूनगर, रॉबीन राहुल बोरकर, गणेश ऊर्फ गोल्डी ...

ठळक मुद्देमोक्का विशेष न्यायालयअंगावर वारंवार स्कॉर्पिओ घालून घडविले होते हत्याकांडमहत्त्वाचे साक्षीदार झाले होते फितूर

 

नागपूर : नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत हसनबाग भागात स्कॉर्पिओ वारंवार अंगावर घालून तिघांचे खून केल्याचा आरोप असलेल्या सात आरोपींची मोक्का विशेष न्यायालयाचे न्यायाधीश शेखर मुनघाटे यांच्या न्यायालयाने सबळ पुराव्यांच्या अभावी संशयाचा लाभ देत निर्दोष सुटका केली.जगदीश विठ्ठल कोसूरकर, दिलीप विठ्ठल कोसूरकर दोन्ही रा. छापरूनगर, रॉबीन राहुल बोरकर, गणेश ऊर्फ गोल्डी जन्मोजय कुटे, दीपक ऊर्फ मुन्ना बालकदास गिले, रवी सदानंद खोब्रागडे आणि तुषार ऊर्फ दद्दू छोटुजी लोणारे, अशी आरोपींची नावे आहेत. रशीदखान जसीमखान, अब्दुल बेग आणि रोहित नारनवरे, अशी मृताची नावे होती.खटल्याची पार्श्वभूमी अशी, हिवरीनगर येथील कुख्यात गुन्हेगार राहुल चेपट्या हा २० जून २०१४ रोजी आपल्या साथीदारांना सोबत घेऊन सक्करदरा तलावाजवळील हॉटेल बॉलिवूड सेंटर पॉर्इंट येथे कुख्यात गज्जू वंजारी याच्या लग्न संमारंभात गेला होता. या ठिकाणी चेपट्यासोबत जगदीश कोसूरकर आणि त्याच्या साथीदारांनी भांडण केले होते. आरोपींनी चपट्यावर तलवार, चाकू आणि सुरी उगारून दगडफेक केली होती. चेपट्यासोबत असलेले जुना बगडगंज भागातील प्रदीप भारत घोडे, रशीदखान, अब्दुल बेग आणि रोहित नारनवरे, असे चौघे जण फ्रिडम मोटरसायकलने पळून जात असता आरोपींनी त्यांचा स्कॉर्पिओने पाठलाग सुरू केला होता. हसनबाग भागात आरोपींनी स्कॉर्पिओ राँगसाईड घेत मोटरसायकलवर धडकवली होती. मोटरसायकल चालवीत असलेला प्रदीप घोडे हा पळून गेला होता. तर उर्वरित तिघे स्कॉर्पिओच्या धडकेने ठार झाले होते.प्रदीप घोडे याच्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी प्रारंभी भादंविच्या ३०२, ३०७, १२० (ब), २०१, १४१, १४३, १४४, १४८, १४९, ५०६(ब), शस्त्र कायद्याच्या ४/२५, मुंबई पोलीस कायद्याच्या कलम १३५ अन्वये १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. पुढे या आरोपींविरुद्ध महाराष्टÑ संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अन्वये कारवाई करण्यात आली होती. केवळ सात आरोपी पोलिसांच्या हाती लागले होते. उर्वरित अखेरपर्यंत फरार राहिले. सहाय्यक पोलीस आयुक्त टी. डी. गौंड यांनी तपास करून आरोपींविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. न्यायालयात साक्षीपुराव्यादरम्यान महत्त्वाचे साक्षीदार फितूर झाले होते. न्यायालयात आरोपींच्या वतीने अ‍ॅड. आर. के. तिवारी, अ‍ॅड. प्रफुल्ल मोहगावकर, अ‍ॅड. चेतन ठाकूर यांनी काम पाहिले.

 

टॅग्स :nagpurनागपूरCourtन्यायालय