लाेकमत न्यूज नेटवर्क
बेला : संदीप लीलाधर वराडे (२३, रा. बेला, ता. उमरेड) याच्या आत्महत्या प्रकरणात बेला पाेलिसांनी तिघांना अटक केली असून, तिन्ही आराेपींना न्यायालयाने न्यायालयीन काेठडी सुनावली आहे. त्यामुळे त्यांची तुरुंगात रवानगी करण्यात आली. आराेपींमध्ये त्याच्या पत्नी व सासऱ्यासह अन्य एकाचा समावेश आहे.
आराेपींमध्ये सासरा ज्ञानेश्वर आंबटकर (५३), सासऱ्याचा लहान भाऊ अशाेक आंबटकर (५०), रा. उमरी, ता. समुद्रपूर, जिल्हा वर्धा व संदीपच्या २० वर्षीय पत्नीचा समावेश आहे. संदीपची पत्नी माहेरी गेल्यानंतर तिला सासरी पाठविण्यास त्याच्या सासऱ्याने नकार दिला हाेता. शिवाय, सासरच्या मंडळीने संदीपला अपमानास्पद वागणूक दिली. त्याला कुणीही मानसिक आधार न दिल्याने नैराश्यातून त्याने साेमवारी (दि. ३०) सकाळी गळफास लावून आत्महत्या केली. स्थानिक नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतल्याने प्रकरण चिघळण्याची शक्यता निर्माण झाली. त्यामुळे पाेलिसांनी भादंवि ३०६, ३४ अन्वये गुन्हा नाेंदवून तपासाला सुरुवात केली.
या तिन्ही आराेपींना मंगळवारी (दि. ३१) सकाळी बुटीबाेरी (ता. नागपूर ग्रामीण) येथून अटक केल्याची माहिती तपास अधिकारी तथा पाेलीस उपनिरीक्षक राहुल ठेंगणे यांनी दिली. त्यांना दुपारी उमरेड येथील प्रथमश्रेणी न्यायालयात हजर केले हाेते. आराेपींना पाच दिवसाची पाेलीस काेठडी मिळावी म्हणून पाेलिसांनी न्यायालयाला विनंती केली हाेती. मात्र, न्यायालयाने तिन्ही आराेपींना न्यायालयीन काेठडी सुनावली. त्यामुळे त्यांची नागपूर शहरातील मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली. आराेपींकडून त्यांचे माेबाईल तसेच मृत संदीपचा माेबाईल जप्त करण्यात आल्याची माहिती पाेलीस उपनिरीक्षक राहुल ठेंगणे यांनी दिली.
...
आपसी तडजाेडीची सूचना
संदीप वराडे व त्याचा काका बुधवारी (दि. २५) पाेलीस ठाण्यात आले हाेते. त्यांनी ताेंडी तक्रार नाेंदविली हाेती. पत्नी घर साेडून जात असल्याचे संदीपने सांगितले हाेते. काहीतरी करा, अशी विनंतीही त्याने केली हाेती. त्यामुळे आपण त्याची पत्नी, सासरा व पत्नीच्या काकाला पाेलीस ठाण्यात बाेलावून समजावून सांगितले हाेते. आपसी तडजाेड करण्याचा सल्लाही त्यांना दिला हाेता, अशी माहिती ठाणेदार पंकज वाघाेडे यांनी दिली.