माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या उल्लंघनाचा गुगलवर आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 09:32 PM2017-12-11T21:32:43+5:302017-12-11T21:34:01+5:30

माहिती तंत्रज्ञान कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप करणाऱ्या  एका रिट याचिकेवर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती स्वप्ना जोशी यांच्या खंडपीठाने केंद्र सरकारमार्फत माहिती तंत्रज्ञान सचिव, कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमचे महासंचालक, गुगल इंडिया, ग्राहक तक्रार वेबसाईटचे कार्यकारी अधिकारी, तक्रारमंडळ वेबसाईटचे कार्यकारी अधिकारी, आदित्य बिझिनेस सोल्युशन मार्फत संचालक अनिलकुमार सिंग, चंद्रकांत प्रसाद आणि जुली जॉन यांना नोटीस जारी केली आहे.

Allege on Google for violation of Information Technology Act | माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या उल्लंघनाचा गुगलवर आरोप

माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या उल्लंघनाचा गुगलवर आरोप

Next
ठळक मुद्देहायकोर्टाची केंद्र सरकार, गुगल व रशियन वेबसाईटला नोटीस

आॅनलाईन लोकमत
नागपूर : माहिती तंत्रज्ञान कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप करणाऱ्या  एका रिट याचिकेवर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती स्वप्ना जोशी यांच्या खंडपीठाने केंद्र सरकारमार्फत माहिती तंत्रज्ञान सचिव, कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमचे महासंचालक, गुगल इंडिया, ग्राहक तक्रार वेबसाईटचे कार्यकारी अधिकारी, तक्रारमंडळ वेबसाईटचे कार्यकारी अधिकारी, आदित्य बिझिनेस सोल्युशन मार्फत संचालक अनिलकुमार सिंग, चंद्रकांत प्रसाद आणि जुली जॉन यांना नोटीस जारी केली आहे.
नागपूर येथील सॉफ्टवेअर कंपनी बिग व्ही टेलिकॉम प्रायव्हेट लिमिटेडने ही याचिका दाखल केली आहे.
माहिती तंत्रज्ञानाच्या नियम (३)(१)(११) आणि माहिती तंत्रज्ञानाच्या कलम ८७(२)(झेडजी) अंतर्गत जे मध्यस्थी मार्गदर्शन नियम तयार करण्यात आले त्यानुसार प्रत्येक वेबसाईट मध्यस्थीसाठी गोपनीय नियम आणि युजर्स अग्रीमेंट प्रकाशित करणे अत्यावश्यक आहे. तक्रारनिवारण अधिकारी नेमून त्याचे नाव जाहीर करणे आवश्यक आहे, या गंभीर बाबी याचिकेत नमूद करण्यात आलेल्या आहेत.
याचिकाकर्त्या कंपनीचे वकील अ‍ॅड. तुषार मंडलेकर यांनी न्यायालयात युक्तिवाद करताना सांगितले की, वैधानिक पालन न करणाऱ्या  विदेशी वेबसाईटविरुद्ध केंद्र सरकारने कारवाई करणे आवश्यक आहे. कलम ६७ -सी, ७२-ए आणि ७९(३)(ब) मधील प्रावधानांचे उल्लंघन ही बाब गंभीर असून यासाठी फौजदारी कारवाईही केली जावी.
याचिकाकर्त्या कंपनीने असाही आरोप केला की, ही एक पंजीकृत कंपनी आहे. ही कंपनी टेलिकॉम सोल्युशन संबंधित सॉफ्टवेअर प्रोग्राम पुरवण्याचा व्यवसाय करीत असते. भारतात या कंपनीचे अनेक ग्राहक आहेत. त्यामुळे या कंपनीने भारतात फ्रान्चायजी नेमलेले आहेत. करारानुसार आपले विक्री उद्दिष्ट गाठण्यात या फ्रेन्चायजी अपयशी ठरल्या आहेत. त्यांनी सामंजस्य कराराचा भंग केल्यामुळे याचिकाकर्ता कंपनी नुकसानभरपाई मिळण्यास पात्र आहे. फ्रेन्चायजीचे मालक अनिलकुमार आणि जुली जॉन यांनी याचिकाकर्त्या कंपनीविरुद्ध दोन रशियन वेबसाईटवर आक्षेपार्ह, बदनामीकारक आणि द्वेषपूर्ण माहिती पोस्ट केली आहे. या वेबसाईटनी नागरिकांमध्ये आमच्या कंपनीविरुद्ध मोठ्या प्रमाणावर संभ्रम निर्माण केलेला आहे. ग्राहक मंच संदर्भात मजबूत कायदे असताना या वेबसाईट आणि गुगलने तयार केलेली आपली समांतर यंत्रणा ही धोकादायक स्वरूपाची असून राष्ट्राच्या हेतूच्या विरोधात आहे, असा आरोपही याचिकेत करण्यात आलेला आहे.
प्रतिवादी वेबसाईट, गुगल आणि केंद्रसरकारकडे याचिकाकर्त्या कंपनीविरुद्धचा आक्षेपार्ह आणि बदनामीकारक मजकूर काढून घेण्याची वारंवार विनंती करण्यात आली. परंतु कोणतीही कार्यवाही न झाल्याने ही याचिका दाखल करण्यात आली. न्यायालयाने प्रतिवादींना १८ जानेवारी २०१८ रोजी उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहे.
न्यायालयात याचिकाकर्त्या कंपनीच्या वतीने अ‍ॅड. तुषार मंडलेकर, अ‍ॅड. महिंद्रा लिमये, अ‍ॅड. रोशन मालविय यांनी बाजू मांडली. सहायक सॉलिसिटर जनरल अ‍ॅड. उल्हास औरंगाबादकर यांनी केंद्र सरकारच्या वतीने नोटीस स्वीकारली.

Web Title: Allege on Google for violation of Information Technology Act

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.