शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

परवानगी होती दोन झाडांची, कापली दोनशेवर झाडे; अजनी इंटर मॉडेल स्टेशन प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2023 8:27 PM

Nagpur News अजनी येथील इंटर मॉडेल स्टेशन प्रकल्पाकरिता केवळ दोन झाडे कापण्याची परवानगी होती. मात्र, तब्बल दोनशेवर झाडे विनापरवानगी कापण्यात आली, अशी माहिती महानगरपालिका आयुक्तांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली आहे.

नागपूर :  अजनी येथील इंटर मॉडेल स्टेशन प्रकल्पाकरिता केवळ दोन झाडे कापण्याची परवानगी होती. मात्र, रेल लॅण्ड डेव्हलपमेंट ऑथोरिटी व कंत्राटदार की स्टोन इन्फ्रा बिल्ड यांनी तब्बल दोनशेवर झाडे विनापरवानगी कापली, अशी धक्कादायक माहिती महानगरपालिका आयुक्तांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली आहे. यासंदर्भात बुधवारी प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले.

हा प्रकल्प अमलात आणताना पर्यावरणाचे नुकसान होऊ नये, यासाठी स्वच्छ असोसिएशनने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. दरम्यान, असोसिएशनने या प्रकल्पाकरिता अनेक झाडे अवैधपणे कापली जात असल्याचा आरोप केला होता. तसेच, यासंदर्भात २२ एप्रिल रोजी महानगरपालिकेला तक्रार सादर केल्याचे सांगितले होते. त्यामुळे न्यायालयाने महानगरपालिकेला यावर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार, हे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले. स्वच्छ असोसिएशनच्या तक्रारीनंतर मनपाच्या उद्यान अधीक्षकांनी प्रकल्प स्थळाचे सर्वेक्षण केले असता एका भागातील ९७, तर दुसऱ्या भागातील १०० ते १२० झाडे विनापरवानगी कापण्यात आल्याचे आढळून आले, असे मनपाने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

इंटर मॉडेल स्टेशन प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात ५४ एकर जमिनीवर विकासकामे केली जाणार आहेत. रेल लॅण्ड डेव्हलपमेंट ऑथोरिटीने विकासकामे करण्यासाठी कीस्टोन इन्फ्रा बिल्ड या कंत्राटदाराची नियुक्ती केली आहे. या कंत्राटदाराने १२ एप्रिल २०२३ रोजी मनपाच्या वृक्ष प्राधिकरणला अर्ज सादर करून केवळ दोन झाडे कापण्याची परवानगी मागितली होती. त्यामुळे उद्यान अधीक्षकांनी त्यांना १८ एप्रिल रोजी पत्र पाठवून ७६ नवीन झाडे लावण्याचे व त्यांची सात वर्षे देखभाल करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर १ जून रोजी वृक्ष प्राधिकरणने या निर्देशाचे पालन करण्याच्या अटीवर कीस्टोनला दोन झाडे कापण्याची परवानगी दिली होती. इतर झाडे विनापरवानगी कापण्यात आली. सध्या प्रकल्पस्थळी ३५७ झाडे शिल्लक आहेत, असेही मनपाने न्यायालयाला सांगितले.

इमामवाडा पोलिसांनी नोंदविला एफआयआर

अवैधपणे झाडे तोडण्यात आल्यामुळे मनपाने इमामवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी १० मे रोजी संबंधित आरोपींविरुद्ध वृक्ष संवर्धन कायद्यातील कलम २१ अंतर्गत एफआयआर नोंदविला आहे. याशिवाय, मनपा उद्यान अधीक्षकांनी २५ एप्रिल रोजी रेल ऑथोरिटी व कीस्टोन या दोघांनाही नोटीस बजावली होती. त्यांनी नोटीसला उत्तर सादर करून आरोपांचे खंडन केले, असेही मनपाने प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.

टॅग्स :Governmentसरकार