शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

मुंबईसोबत औरंगाबाद एअरपोर्टलाही देण्यात आला होता अलर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2021 4:08 AM

नागपूर एअरपोर्ट तब्बल चार तास होते संपर्कात लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : एअर ॲम्ब्युलन्सने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ...

नागपूर एअरपोर्ट तब्बल चार तास होते संपर्कात

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : एअर ॲम्ब्युलन्सने

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून गुरुवारी सायंकाळी मुंबईकडे झेप घेतली आणि १२ व्या वॉच टॉवरवरून या विमानाकडे सूक्ष्म नजर ठेवून असलेले सीआयएसएफचे हवलदार रवीकांता आवला काही क्षणासाठी चमकले. त्यांनी लगेच सीआयएसएफचे डेप्युटी कमांडर रवीकुमार जी. यांना ॲम्ब्युलन्सचे चाक निखळून पडल्याची माहिती दिली. रविकुमार यांनी तत्काळ एअरपोर्ट सिक्युरिटी ॲथॉरिटीसोबत संपर्क साधला. खबरदारी घेतली नाही तर मोठी दुर्घटना होऊ शकते, हे लक्षात आणून दिले. त्यानंतर मुंबई आणि औरंगाबाद एअरपोर्टला अलर्ट देण्यात आला आणि त्याचमुळे गुरुवारची मोठी संभाव्य दुर्घटना टळली.

येथील एअरपोर्टवरून

इंधन भरून एअर अ‍ॅम्ब्युलन्सने मुंबईकडे उड्डाण भरल्यानंतर धावपट्टीवर अचानक एक चाक निखळून पडले. या घडामोडी पासून विमानाचे चालक दल अनभिज्ञ होते. मात्र, सीआयएसएफचे हवालदार रवीकांत आवला यांनी तत्काळ आपले डेप्युटी कमांडंट रवीकुमार यांना ही माहिती कळविली.

त्यानंतर ही माहिती वैमानिकाला देण्यात आली. मुंबई आणि औरंगाबाद एअरपोर्टवर माहिती देऊन इमर्जन्सी लँडिंगची तयारी ठेवण्याची सूचना करण्यात आली. योग्य आणि तातडीच्या उपाययोजना करण्याची गरज विशद करून नागपूरची यंत्रणा तब्बल चार तास सलग मुंबई एअरपोर्टशी संपर्कात होते. त्याचमुळे वैमानिकाने अत्यंत कौशल्याने विमान धावपट्टीवर उतरविले. एक अत्यंत मोठी दुर्घटना टाळण्यासाठी सीआयएसएफचे जवान रविकांत यांनी दाखवलेली सतर्कता लक्षात घेऊन सीआयएसएफच्या महासंचालकांनी रविकांत

यांना आज १० हजार रुपये रोख बक्षीस आणि प्रशस्तिपत्र जाहीर करून गौरविले. सीआयएसएफ महासंचालकांनी तशी घोषणा ट्वीट करत केली. सैन्याच्या प्रमुखांनीदेखील रविकांत यांनी दाखवलेल्या सतर्कतेबद्दल त्यांचे कौतुक केले आहे.

या संबंधाने नागपूर एअरपोर्ट सीआयएसएफ युनिटचे डेप्युटी कमांडंट रवीकुमार यांनीही रविकांत यांचे कौतुक करून आज त्यांचा यथोचित गौरव केला.

---

ही सतर्कता प्रेरणादायी

रविकांत यांच्या सतर्कतेमुळे विमानातील रुग्ण, डॉक्टर आणि क्रू मेंबर बचावले.

त्यांची सतर्कता सुरक्षा यंत्रणेतील प्रत्येकाला प्रेरणा देणारी आहे, असे रविकुमार यांनी लोकमतशी बोलताना स्पष्ट केले.

---