शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

डाळींसोबत खाद्यतेलाचे दरही महागले; स्वयंपाकघरातील वस्तू महाग

By मोरेश्वर मानापुरे | Published: June 12, 2024 7:41 PM

डाळींच्या किंमती आधीच गगनाला भिडल्या होत्या तर आता खाद्यतेलाचे भावही वाढले

नागपूर : रोजचा दिवस काहींना काही तरी भाव वाढ घेऊन येतो. डाळींच्या किंमती आधीच गगनाला भिडल्या होत्या तर आता खाद्यतेलाचे भावही वाढले आहेत. सध्या सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाचा पुरवठा पूर्वीसारखा होत नाही. उन्हाळ्यात खास लोणच्यासाठी वापरले जाणारे मोहरीचे तेल प्रति किलो १० रुपयांनी महाग होऊन १४० रुपयांवर पोहोचले आहे. 

वाढत्या महागाईच्या काळात खाद्यतेलाच्या किंमतींमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली असताना आता सर्वसामान्य जनतेच्या खिशाला कात्री लागणार असल्याचे दिसते. पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींचा तिसरा कार्यकाळ सुरू होताच महागाईचा भडकाही उडाला आहे. डाळी आधीच १९० रुपयांपर्यंत पोहोचल्या तर आता सर्वच खाद्यतेल महागले आहे. अर्जेंटिना आणि ब्राझीलमधून होणाऱ्या सोयाबीन तेलाचा पुरवठा कमी झाल्यामुळे तसेच देशांतर्गत मोहरीचे तेल महागणे भाववाढ मागचे कारण सांगितले जात आहे. देशांतर्गत मागणी पूर्ण करण्याच्या उद्देशाने दरवर्षी सुमारे ३० ते ४० लाख टन सोयाबीन तेलाची आयात केली जाते.

आयात शुल्क १५ वरून शून्य टक्के

केंद्र सरकारने आयात तेलावरील आयात शुल्क १५ टक्क्यांवरून शून्य टक्क्यांवर आणले आहे. त्यामुळे सोयाबीन, सूर्यफूल, पाम या तेलाची आयात वाढली. त्यानंतरही खाद्यतेलाच्या भावात वाढ झाली. मलेशिया, इंडोनिशियात पाम, ब्राझील, कॅनडा, अर्जेटिनामध्ये सोयाबीन आणि रशिया व युक्रेन देशात सूर्यफूलाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले. त्यावेळी खाद्यतेलाचे दर घसरून तीन वर्षांच्या रेकॉर्ड स्तरावर आले होते.

खाद्यतेलाचा किरकोळ भाव तक्ता :

खाद्यतेल महिन्याआधीचे भाव सध्याचे भावसोयाबीन १०८ ११३सूर्यफूल ११५ १२०राईस ब्रान ११० ११५पाम १०५ ११०मोहरी १३० १४०जवस १२० १२५शेंगदाणा १७५ १८०

भाव आणखी वाढण्याची शक्यता

गेल्यावर्षीच्या तुलनेत खाद्यतेलाच्या किमती कमीच आहे. दोन महिन्यांआधी दर वाढले होते. त्यानंतर कमी झाले आणि आता ५ ते १० रुपयांनी पुन्हा वाढले. ही दरवाढ मोठी नाही. किरकोळमध्ये सर्वाधिक विकणारे सोयाबीन तेल ११३ रुपये आणि पाम तेलाचे दर ११० रुपये किलो आहेत. विदेशात सोयाबीन, पाम व सूर्यफूलाचे जास्त उत्पादन झाले आहे. स्थानिक बाजारात पुढे भाव कमी न होता वाढतील.अनिल अग्रवाल, खाद्यतेल व्यापारी.

टॅग्स :nagpurनागपूरFarmerशेतकरी