शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

आधीच पारा ४६ पार त्यात विजेच्या लपंडावाने नागपूरकरांना फोडला घाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 10:37 AM

नवतपाच्या भीषण गरमीने त्रस्त नागपूरकर बुधवारी विजेच्या लपंडावामुळे त्रस्त झाले. सकाळी साप्ताहिक देखरेखीमुळे विजेचा पुरवठा अनेक तास बंद होता तर दुपारी तांत्रिक त्रुटींमुळे बे्रकडाऊनचा क्रम सुरू राहिला.

ठळक मुद्दे देखरेखीकरिता सकाळी पुरवठा बंददुपारी बे्रकडाऊन, नागरिक बेहाल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नवतपाच्या भीषण गरमीने त्रस्त नागपूरकर बुधवारी विजेच्या लपंडावामुळे त्रस्त झाले. सकाळी साप्ताहिक देखरेखीमुळे विजेचा पुरवठा अनेक तास बंद होता तर दुपारी तांत्रिक त्रुटींमुळे बे्रकडाऊनचा क्रम सुरू राहिला. महापारेषणचे बेसा सबस्टेशन ठप्प झाले होते. त्यामुळे शहरातील मोठ्या भागात अनेक तास वीज पुरवठा बंद होता. तर काही भागात विजेचा पुरवठा बंद आणि सुरू राहण्याचा क्रम सुरू होता. वीज नसल्यामुळे कूलर, एसी, पंखे बंद होते. त्यामुळे नागरिक त्रस्त होते.सकाळी ११ पर्यंत दक्षिण-पश्चिम, पश्चिम व दक्षिण नागपुरातील मोठ्या भागात मान्सूनपूर्व तयारी आणि देखभाल, दुरुस्तीच्या नावावर वीज पुरवठा बंद करण्यात आला होता. तर सकाळी ९.२८ वाजता सीताबर्डीहून निघणारे अजमेरा फीडर ठप्प झाले. केबल तुटल्यामुळे दोन ट्रान्सफॉमरहून होणारा पुरवठा प्रभावित झाला. दुपारी १२.५६ वाजता छत्रपती स्टेशनच्या भागातील वीज पुरवठा तांत्रिक त्रुटींमुळे बंद झाला. सीताबर्डी सबस्टेशनशी जुळलेल्या भागात सकाळी ८.५२ वाजता ब्रेकडाऊनमुळे पुरवठा खंडित झाला. हॅम्पयार्ड रोड फीडरवरून (काँग्रेसनगर, छोटी धंतोली) वीज पुरवठा बंद होता. यादरम्यान महापारेषणच्या बेसा येथील १३२/३३ क्षमतेचे सबस्टेशन दुपारी ठप्प होते.महापारेषणच्या सूत्रांनी सांगितले की, केबल जळल्यामुळे ही समस्या उद्भवली. पण काही मिनिटातच सर्व सुरळीत करण्यात झाले. सबस्टेशन ठप्प झाल्यामुळे महावितरणसह एसएनडीएलच्या भागातही वीज पुरवठा बंद होता. एकूण १४ फीडर बंद राहिल्यामुळे कळमना, कामठी रोड, नंदनवन, मेडिकल, छत्रपती चौक परिसर अंधारात होता. यादरम्यान दुपारी ३.५५ वाजता ३३ केव्ही छत्रपतीनगर सबस्टेशनला पारडी सबस्टेशनवरून वीज पुरवठा करणारी लाईन ‘ट्रिप’ झाली. त्यामुळे नंदनवन ते छत्रपती चौकापर्यंतचा भागात वीज नव्हती. भार चिंचभुवन सबस्टेशनवर शिफ्ट करण्याच्या प्रयत्नात ही लाईन ट्रिप झाली. पण हे संकट पुन्हा वाढले. विजेची मागणी जास्त असल्यामुळे हे पुन्हा ट्रिप झाले. दिवसभर विजेमुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना महावितरण अथवा एसएनडीएलचे अधिकारी संतोषजनक उत्तर देऊ शकले नाहीत. वीज थोड्याच वेळात येत असल्याचे उत्तर त्यांच्याकडून वारंवार मिळाले. अनेक कार्यालयांमध्ये ग्राहकांचे फोन उचलले नाही. त्यामुळे लोकांमध्ये रोष होता. छत्रपती सब स्टेशनवर सायंकाळी नागरिक जमा झाले होते.खोदकामामुळे केबल तुटलेबुधवारी अनेक ठिकाणी बे्रकडाऊनचे मुख्य कारण विविध एजन्सींद्वारे करण्यात येणाऱ्या विकास कामांसाठी करण्यात येणारे खोदकाम ठरले. सीताबर्डी सबस्टेशनचे अजमेरा फीडर मनपाच्या स्वच्छता अभियानामुळे तुटले. या प्रकारे दुपारी छत्रपती सबस्टेशनचे केबलसुद्धा विकास कामांमुळे क्षतिग्रस्त झाले. तर नंदनवन भागातील मंगलमूर्ती लॉनचे केबल मनपा एजन्सीच्या खोदकामामुळे तुटले.३.५ लाख ग्राहक प्रभावितदिवसभर होणाऱ्या ब्रेकडाऊनमुळे शहराच्या अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाला. त्यामुळे भीषण गरमीत ग्राहकांना त्रास सहन करावा लागला. एसएनडीएलच्या ३.२५ लाखांसह एकूण ३.५ लाख ग्राहकांना फटका बसला. अनेक घरातील पाण्याचे पंप बंद राहिल्यामुळे पाण्याचे संकट निर्माण झाले. अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे शांतिनगर, बिनाकी, कळमना, वर्धमाननगर, वाठोडा, महाल, रामबाग, जयदुर्गा, नरेंद्रनगर, मानेवाडा, मनीषनगर, नंदनवन, मेडिकल, भगवाननगर, छत्रपती चौक, सीताबर्डी, धरमपेठ, सोमलवाडा, राजीवनगर, तपोवन ले-आऊट, खामला, स्नेहनगर, रहाटे कॉलनी, धंतोली, वैनगंगा कॉलनी, काँग्रेसनगर, बेसा, पारडी, खरे टाऊन, अलंकार टॉकीज, दुर्गा मंदिर परिसर, अत्रे ले-आऊट भाग प्रभावित झाला. अनेक भागात एक तास तर काही भागात जास्त काळ वीज पुरवठा बंद होता.

टॅग्स :electricityवीज