रामटेक : शहरातील श्री नरेंद्र तिडके महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. यावेळी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या आवारात छात्र सेनेच्या मदतीने वृक्षाराेपण केले. या राेपट्यांच्या संगाेपन, देखभालीची जबाबदारी छात्रसेनेच्या विद्यार्थ्यांनी स्वीकारली.
अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. संगीता टक्कामोरे, तर प्रमुख अतिथी म्हणून रामटेक नगर पालिकेचे मुख्याधिकारी हर्षल गायकवाड, माजी विद्यार्थी संघटनेचे संजय बोरकर, रमेश अमृते, राहुल पेटकर, त्रिलोक मेहर, नत्थू घरजाळे, हरिभाऊ अपराजित उपस्थित होते. नगर पालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या वसुंधरा संरक्षण या संकल्पनेची व उपक्रमांची माहिती देण्यात आली. राहुल पेटकर यांनी वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाची पर्यावरण व मानवी जीवनातील गरज यावर मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. संगीता टक्कामोरे यांनी माजी विद्यार्थी संघटना व नगर पालिका यांच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाची प्रशंसा केली. उपस्थितांना वसुंधरा संरक्षणाची शपथ देण्यात आली. प्रास्ताविक डॉ. श्रीकांत भोवते यांनी केले. संचालन प्रा. नरेश आंबिलकर यांनी केले. राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजना व माजी विद्यार्थ्यांच्या वतीने महाविद्यालयाच्या परिसरात विविध राेपट्यांची लागवड करण्यात आली.