नागपूर: मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे वरिष्ठ विभागीय (वाणिज्य) व्यवस्थापक म्हणून अमन मित्तल यांनी पदभार स्वीकारला आहे. यापूर्वी ते मुंबई विभाग मध्य रेल्वेचे विभागीय ऑपरेशन मॅनेजर होते.भारतीय रेल्वे वाहतूक सेवा २०१६ बॅचचे अधिकारी असलेले मित्तल सेंट जोसेफ कॉलेज, बंगळुरूचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी जर्मनीतील ड्यूश बान येथे प्रशिक्षणादरम्यान ट्रेन ऑपरेशन्सबद्दल अभ्यास केला. रेल्वेत रुजू होण्यापुर्वी मित्तल यांनी पाटणा, बिहार येथे सॉफ्टवेअर स्टार्टअपचे नेतृत्व केले होते.
विशेष म्हणजे, मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात परिचालन व्यवस्थापक (कोळसा) या पदावर त्यांनी मार्च २३ मध्ये आतापर्यंतचे सर्वाधिक ५ दशलक्ष टन मासिक मालवाहतुकीचा रेकॉर्ड केला आहे. रेल्वे उपभोक्त्यांना आपण उत्कृष्ट ग्राहक सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहो, असे मित्तल यांनी म्हटले आहे.