शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती मात्र ऐनवेळी भाजपा धक्का देणार?
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
3
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
4
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट
5
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
6
शिंदे म्हणतात, ‘लढाई’ जिंकली, पण ‘युद्ध’ बाकी; २५ तारखेच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?
7
मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा
8
सोनिया, राहुल, प्रियांका - संसदेत तिहेरी तोफ; संसदीय इतिहासात पहिल्यांदाच एकत्र
9
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
10
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
11
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
12
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा
13
मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक
14
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
15
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
16
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
17
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
18
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
19
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
20
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला

अमरनाथ यात्रेकरूंवरील हल्ल्याचा निषेध

By admin | Published: July 13, 2017 2:48 AM

अमरनाथ यात्रेसाठी गेलेल्या भाविकांवर दहशतवाद्यांनी केलेला हल्ला निंदनीय आहे. दहशतवाद्यांना शांततेची भाषा समजत नाही.

मध्य नागपुरात दहशतवाद्यांच्या पुतळ्याचे दहन : अनिस अहमद यांच्या नेतृत्वात आंदोलन लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : अमरनाथ यात्रेसाठी गेलेल्या भाविकांवर दहशतवाद्यांनी केलेला हल्ला निंदनीय आहे. दहशतवाद्यांना शांततेची भाषा समजत नाही. त्यांना त्यांच्या भाषेतच उत्तर देण्याची गरज आहे, अशी मागणी करीत मध्य नागपुरातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मंगळवारी दहशतवाद्यांच्या पुतळ्याचे दहन केले. माजी मंत्री अनिस अहमद यांच्या नेतृत्वात दोसर भवन चौकात झालेल्या या आंदोलनात कार्यकर्त्यांनी दहशतवाद्यांविरोधात घोषणाबाजी केली. या वेळी प्रदेश सचिव अतुल कोटेचा, नगरसेवक झुल्फीकार अहमद भुट्टो, सैयद निजाम बेगम, रिंकु जैन, इरफान काजी, शकील खान आदी उपस्थित होते. या वेळी अनिस अहमद म्हणाले, देशाच्या एकता व अखंडतेला तडा देण्याच्या दूषित हेतूने अमरनाथच्या भाविकांवर दहशवाद्यांनी हल्ला केला आहे. मात्र, अशा घटनांनी भारतवासी घाबरणारे नाहीत. अशा हल्ल्यांनी आस्था कमी होणार नाही. भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी सरकारने कडक पावले उचलावी, अशी मागणी त्यांनी केली. अतुल कोटेचा यांनीही हल्ल्याचा निषेध केला. अशा हल्ल्यांमुळे भाविकांचे मनोबल खचणार नाही. अशा घटनांना देश घाबरत नाही, असे सांगत या दहशतवाद्यांना कडक उत्तर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. आंदोलनात बंटी अब्बुमिया, महेश अग्रवाल, मनीष छल्लानी, सूरज त्रिपाठी, राजेश अग्रवाल, नूरभाई, मिराज खान, इमरान शेख, शानु खान, जलालुद्दीन अंसारी, रियाज अहमद, महेश बनोदे, राजेश सोनकुसरे, प्रवीण निकम, शुभम कोलाटकर आदींनी भाग घेतला.