शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
3
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
4
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
5
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
6
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
7
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
8
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
9
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
10
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
11
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
12
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
13
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
14
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
15
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
16
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
18
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
19
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
20
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...

गुरू-शुक्राची आज विलोभनीय युती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2023 8:00 AM

Nagpur News १ मार्च २०२३ रोजी सूर्यास्तानंतर पश्चिम आकाशात गुरू आणि शुक्र ग्रहांची अतिशय विलोभनीय युती पाहावयास मिळणार आहे. ही खगाेलीय घडामाेड १५ वर्षांत एकदा घडत असून यानंतर अशी युती पाहण्यासाठी १५ वर्षे वाट पहावी लागणार आहे.

नागपूर : आज १ मार्च २०२३ रोजी सूर्यास्तानंतर पश्चिम आकाशात गुरू आणि शुक्र ग्रहांची अतिशय विलोभनीय युती पाहावयास मिळणार आहे. ही खगाेलीय घडामाेड १५ वर्षांत एकदा घडत असून यानंतर अशी युती पाहण्यासाठी १५ वर्षे वाट पहावी लागणार आहे.

रमण विज्ञान केंद्राचे खगाेल शिक्षक महेंद्र वाघ यांनी सांगितले, सध्या गुरू आणि शुक्र हे मीन राशीत असून ते गेल्या आठवड्यापासून जवळ येत आहेत. १ ते ५ मार्चपर्यंत ही युती जवळ राहणार असली तरी सर्वाधिक जवळ  १ मार्चला राहणार आहे. आकाशात सर्वाधिक तेजस्वी असे दोन ग्रह एक डिग्री पेक्षा कमी अंतरावर येण्याची आणि पाहण्यासाठी ही दुर्मीळ संधी आहे. ही युती भासमान युती आहे. जरी हे दोन ग्रह जवळ दिसत असले तरी पृथ्वीपासून त्यांचे अंतर खूप जास्त आहे. शुक्र पृथ्वीपासून २०,५६,३१,१४१ कोटी कि.मी. तर गुरू ८६,१८,४३,१९२ कोटी किमी अंतरावर असतील. १ मार्चला दोघांतील अंतर एक डिग्रीच्या कमी म्हणजे ३९ आर्कमीटर अंतरावर असेल तर २ मार्चला ४५ आर्कमीटर अंतरावर असेल. यादरम्यान शुक्राची तेजस्विता -४.२ तर गुरूची तेजस्विता -२.० असेल. ३, ४, ५ मार्चपर्यंतसुद्धा ते १ ते २ डिग्री इतक्या कमी अंतरावर असतील. पुढे गुरू ग्रह सूर्याकडे गेलेला दिसेल तर शुक्र आकाशात वर येताना दिसेल.

रमण विज्ञान केंद्रात निरीक्षणाची संधी

रमण विज्ञान केंद्र व तारा मंडळाच्यावतीने २८ फेब्रुवारी ते २ मार्चपर्यंत अवकाश निरीक्षण उपक्रम आयाेजित केला आहे. सायंकाळी ६ ते ७ वाजता शक्तिशाली टेलिस्काेपद्वारे गुरू आणि शुक्र ग्रहाची युती पाहण्याची संधी अवकाशप्रेमी व विद्यार्थ्यांना आहे.

टॅग्स :scienceविज्ञान