लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : आज जातीयवादी शक्ती या देशातील लोकशाही नष्ट करू पाहत आहे. अनुसूचित जाती, जमाती, ओबीसीसह एकूणच बहुजन समाजाला मिळालेले संविधानिक हक्क हिरावून घेतले जात आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी बहुजन समाजासमोर आजच्या घडीला केवळ आणि केवळ अॅड. प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर हेच एकमेव पर्याय आहेत. तेव्हा आपसातले सारे मतभेद विसरून त्यांना शक्ती द्या, असे आवाहन भारिप बहुजन महासंघाच्या नेत्यांनी शनिवारी कार्यकर्ता मेळाव्यात केले.भारिप बहुजन महासंघ नागपूर शहर व जिल्हा यांच्यावतीने उंटखाना येथील अजंटा सभागृहात कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी पक्षाचे महासचिव अमित भुईगळ होते तर पक्षाचे सल्लागार माजी आमदार हरिभाऊ भदे, कुशल मेश्राम, युसुफ पुंजानी, डॉ. सुरेश रोकडे प्रमुख मार्गदर्शक होते. व्यासपीठावर अॅड. संदीप नंदेश्वर, शहराध्यक्ष विनोद गजभिये, वनमाला उके, मनिषा लोखंडे, राजू मेश्राम प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी पक्षातील अनेक ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा व नेत्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी मोठ्या संख्येने इतर पक्षातील व सामाजिक संघटनांमध्ये काम करणाऱ्यांनी पक्षात प्रवेश घेतला. त्यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला.अमित भुईगळ आपल्या अध्यक्षीय भाषणात, बहुजन समाजाचे एकमेव नेतृत्व म्हणजे प्रकाश आंबेडकर असल्याचे स्पष्ट केले. आंबेडकरी समाजासह एकूणच बहुजन समाजावर जेव्हा-जेव्हा अन्याय अत्याचार झाला, तेव्हा-तेव्हा प्रकाश आंबेडकर धावून आले. रस्त्यावर उतरले. तेव्हा त्यांना साथ द्या. येणाºया निवडणुकीमध्ये सर्व समाजाने आपापले मतभेद विसरून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा. यापुढे महाराष्ट्रात प्रकाश आंबेडकर यांना विश्वासात घेतल्याशिवाय कुणाचेही सरकार बनणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. उपस्थित इतर वक्त्यांनी सुद्धा आपल्या भाषणात समाजाने प्रकाश आंबेडकरांमागे एक शक्ती म्हणून उभे राहावे, असे आवाहन केले.प्रास्ताविक सेवक डांगे यांनी केले. संचालन अजय सहारे यांनी केले.
‘आंबेडकर’ हेच बहुजन समाजाला पर्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 8:25 PM
आज जातीयवादी शक्ती या देशातील लोकशाही नष्ट करू पाहत आहे. अनुसूचित जाती, जमाती, ओबीसीसह एकूणच बहुजन समाजाला मिळालेले संविधानिक हक्क हिरावून घेतले जात आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी बहुजन समाजासमोर आजच्या घडीला केवळ आणि केवळ अॅड. प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर हेच एकमेव पर्याय आहेत. तेव्हा आपसातले सारे मतभेद विसरून त्यांना शक्ती द्या, असे आवाहन भारिप बहुजन महासंघाच्या नेत्यांनी शनिवारी कार्यकर्ता मेळाव्यात केले.
ठळक मुद्देकार्यकर्ता मेळावा : भारिप बहुजन महासंघाच्या नेत्यांचा एकसूर