शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
2
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
3
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
4
सरपंच-उपसरपंचांच्या वेतनात वाढ, ग्रामसेवक पदाचं नाव बदललं; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
5
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
6
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
7
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
8
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
9
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य
10
लोकलमध्ये सापडली नोटांनी भरलेली बॅग, रक्कम पाहून पोलीसही अवाक्, तपास सुरू
11
“मिस्टर संभाजी भोसले, ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही”; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
12
तिरुपती बालाजी मंदिराचे शुद्धीकरण, भगवान व्यंकटेश्वर स्वामींची मागितली माफी
13
Airtel New Recharge Plans: एअरटेलनं लाँच केले ३ नवे प्लॅन्स; रिचार्ज करण्यापूर्वी एकदा पाहाच, काय आहे खास?
14
टीम इंडियानं पाडला बांगलादेशचा बुक्का; मग चव्हाट्यावर आला पाक क्रिकेटमधील 'मॅटर'; जाणून घ्या सविस्तर
15
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
16
युक्रेन युद्धादरम्यान रशियाला मोठा धक्का, चाचणीदरम्यान फुटलं महाक्षेपणास्त्र
17
तिरुपती लाडू वाद: सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल; तपास समिती स्थापन करण्याची मागणी
18
डेटिंग अ‍ॅपवरून ओळख, मुलावर जडलं प्रेम अन् एका फोनमुळे गमावले लाखो रुपये...
19
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर
20
डॉक्टर व्हायचेय, पण बजेट २० लाख आहे, मग या देशात होऊ शकता MBBS

आंबेडकरवादी आणि कम्युनिस्टांनी एकजूट व्हावे

By admin | Published: November 17, 2014 12:57 AM

देशात पुन्हा एकदा धर्मसत्ता आणून सामाजिक गुलामगिरी थोपविण्याचे कटकारस्थान सुरू झाले आहे. एकीकडे दलितांवरील अत्याचार वाढले आहेत तर दुसरीकडे नवभांडवलशाहीच्या माध्यमातून श्रमिक-मजुरांना

दलित हत्याकांड निषेध परिषद : श्यामदादा गायकवाड यांचे प्रतिपादन नागपूर : देशात पुन्हा एकदा धर्मसत्ता आणून सामाजिक गुलामगिरी थोपविण्याचे कटकारस्थान सुरू झाले आहे. एकीकडे दलितांवरील अत्याचार वाढले आहेत तर दुसरीकडे नवभांडवलशाहीच्या माध्यमातून श्रमिक-मजुरांना संपविण्याचे घाट घातला जात आहे. तेव्हा या भीषण परिस्थितीतून दलित, शोषित, कष्टकरी, मजुरांना वाचविण्यासाठी आंबेडकरवादी आणि कम्युनिस्टांनी एकत्र येऊन लढणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (सेक्युलर)चे अध्यक्ष श्यामदादा गायकवाड यांनी आज येथे केले. रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (सेक्युलर) च्यावतीने आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टी, सीपीएम, फॉरवर्ड ब्लॉक, जनता दल (यू), बोल्शेविक पक्ष, युडीएफ, शेकाप, समता सैनिक दल आदी विविध संघटनांच्या सहयोगाने रविवारी हिंदी मोरभवन सीताबर्डी येथे ‘जवखेडे दलित हत्याकांड निषेध परिषद’ आयोजित करण्यात आली होती. या परिषदेच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार प्रा. रणजित मेश्राम यांच्या हस्ते मशाल पेटवून या परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. श्यामदादा गायकवाड म्हणाले, जवखेडे हत्याकांड हा केवळ योगायोग नाही तर ही जातीयवादी व्यवस्था पुन्हा देशात लागू करण्याची सुरुवात आहे. कारण या हत्याकांडातील दोषींना अजूनही अटक झालेली नाही. आरोपी कोण आहेत, हे सत्ताधाऱ्यांपासून तर विरोधी पक्षातील नेत्यांपर्यंत सर्वांनाच माहिती आहे. तरी आरोपीला अटक होत नाही, याला आणखी काय म्हणावे. आंबेडकरी संघटना आज कमकुवत झाल्या आहेत, आमचे नेते लाचार झाल्यामुळेच ही परिस्थिती निर्माण झाली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरानंतर प्रतिकार करणारी संघटना आपण निर्माण करू शकलो नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. ही व्यवस्था केवळ दलितांच्या विरोधातच आहे असे नाही तर श्रमिक, कष्टकरी यांना संपविण्याचे घाट सुद्धा घातला जात आहे.या जातीयवादी आणि भांडवलशाहीविरुद्ध केवळ आंबेडकरवादी आणि कम्युनिस्टांनीच लढा दिलेला आहे. आज या दोन्ही संघटनांची शक्ती कमकुवत झाली असली तरी ती संपलेली नाही. त्यामुळे नव्या दमाने पुन्हा लढण्यासाठी आंबेडकरवादी आणि कम्युनिस्टांनी एकत्र यावे, असे आवाहन त्यांनी केले. प्रा. रणजित मेश्राम आणि प्रदीप गायकवाड यांनीही जवखेडे हत्याकांडावर प्रकाश टाकला. भाऊराव बादसे यांनी क्रांतिगीत सादर केले. अशोक सरस्वती यांनी प्रास्ताविक मांडले. दिनेश अंडरसहारे यांनी संचालन केले. (प्रतिनिधी)