एअर इंडिया इंजिनी अरिंग सर्व्हिसेसची बैठक : जीएम व संचालक सहभागीनागपूर : मिहानमधील एअर इंडियाच्या देखभाल व दुरुस्ती सेंटरमध्ये (एमआरओ) आता एअरबस कंपनीच्या सर्व विमानांची देखभाल व दुरुस्ती होणार आहे. शनिवारी एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेडच्या (एआयईएसएल) वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत एअर इंडियाच्या देखरेख व दुरुस्तीच्या परवानगीसंदर्भातील कागदपत्रे तयार केली असून आवश्यक उपकरणे आणि सामग्रीसुद्धा उपलब्ध करण्यात आली. बोर्इंग-७७७ चे सर्व चेक्स आणि एअरबसची देखभाल आणि दुरुस्तीच्या तयारीवर चर्चा करण्यात आली. एआयईईएसएलच्या कार्यकारी संचालकांनी एमआरओचे निरीक्षण करून एमआरओमध्ये उपलब्ध संसाधने आणि उपकरणांच्या व्यवस्थेवर समाधान व्यक्त केले. एमआरओला विश्वस्तरीय बनविण्याची तयारी, थर्ड पार्टी व्यवसायाला मजबूत करणे आणि उच्च मानकांच्या उपयोगावर चर्चा करण्यात आली.एअरबस-३२० करिता कागदपत्रे तयार करण्यात आली. त्याला मंजुरीसाठी दोन आठवड्यानंतर भारतीय उड्ड्यण महासंचालयालयाकडे (डीजीसीए) पाठविण्यात येणार आहे. बैठकीत दिल्ली, मुंबई, कोलकाता, हैदराबादचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)‘४ ए’ चेकने प्रारंभ होणारएअरबस-३२० विमानाच्या देखभाल व दुरुस्तीला परवानगी मिळाल्यानंतर ‘४ए’ चेकला प्रारंभ होणार आहे. याअंतर्गत विमानाची देखभाल व दुरुस्तीसाठी दोन महिने एमआरओमध्ये ठेवण्यात येणार आहे. भारतात घरगुती व विदेशात उड्डाणासाठी बहुतांश बोर्इंग आणि एअरबस विमानांचा उपयोग करण्यात येतो. दोन्ही कंपन्यांच्या विमानाची देखभाल व दुरुस्ती एमआरओमध्ये होणार असल्यामुळे नागपुरात विमानांची ये-जा वाढणार आहे. बोर्इंग-७७७ विमानासाठी एमआरओमध्ये ‘डी’ चेकपर्यंत सर्व तपासण्या करण्यात येतात. यासाठी आवश्यक पदभरती करण्यात आली आहे. आता देशातील सर्व संचालक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीमुळे एमआरओच्या पूर्ण संचालनाच्या दिशेने मोठे पाऊल समजले जात आहे. ४५० एकर जमिनीवर ५०० कोटींच्या गुंतवणुकीतून एमआरओची निर्मिती.४एमआरओच्या संचालनासाठी १० मे २०१५ ला डीजीसीएची परवानगी.४एक दिवसात दोन मोठे आणि सहा लहान विमान ठेवता येतात.
एमआरओमध्ये ‘एअरबस’चीही दुरुस्ती
By admin | Published: May 15, 2016 2:36 AM