दुर्गेश यादव, रा. हाेशंगाबाद, मध्य प्रदेश असे जखमी रुग्णवाहिका चालकाचे नाव आहे. त्याने एमपी-०४/टीए-११४५ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेमध्ये हाेशंगाबाद येथून रुग्णाला नागपूर येथे आणले हाेते. त्याला नागपूर शहरातील हाॅस्पिटलमध्ये भरती केल्यानंतर दुर्गेश हीच रुग्णवाहिका घेऊन सकाळी परतीच्या प्रवासाला निघाला. दरम्यान, पिपळा (डाकबंगला) शिवारात त्याचा ताबा सुटला आणि वेगात असलेली रुग्णवाहिका थेट पुलावरून खाली नाल्याच्या पात्रात काेसळली.
सकाळी या मार्गाने फिरायला जाणाऱ्यांना जाेरात आवाज आल्याने त्यांनी पुलाकडे धाव घेतली. त्यांनी दुर्गेशला बाहेर काढले. सुदैवाने त्याला गंभीर दुखापत झाली नाही. मात्र, रुग्णवाहिकेचे माेठे नुकसान झाले. त्यात रुग्ण नसल्याने अनर्थ टळला. त्याच्यावर स्थानिक डाॅक्टरकडे उपचार करण्यात आले. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून ती रुग्णवाहिका हायड्राच्या मदतीने बाहेर काढली. याप्रकरणी खापरखेडा पाेलिसांनी नाेंद केली असून, तपास पाेलीस कर्मचारी नामदेव धांडे करीत आहेत.