शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
5
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
6
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
7
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
8
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
9
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
10
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
11
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
12
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
13
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
14
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
16
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
17
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
18
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
19
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
20
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'

खड्ड्यात अ‍ॅम्ब्युलन्स फसली अन् युवकाचा झाला मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 7:54 PM

एका युवकाला मध्यरात्री हृदयविकाराचा झटका आला. त्याला रुग्णालयात घेऊन जात असताना रस्त्यावरील खड्ड्यात रुग्णवाहिका फसली, त्यामुळे वेळेत रुग्णालयात पोहचू न शकल्याने युवकाचा मृत्यू झाला.

ठळक मुद्देउपराजधानीत घडलीय घटना : आता तरी प्रशासनाला येईल का जाग?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहराचा विकास झपाट्याने होत आहे. जागोजागी सिमेंटचे गुळगुळीत रस्ते बनत आहेत. मात्र या विकासाच्या प्रक्रियेत शहरालगत असलेल्या वस्त्या कोसोदूर आहे. लोकमतने बेसा-बेलतरोडी परिसरातील अशाच काही वस्त्यांवर यापूर्वी फोकस केला होता. घातपाताची शक्यताही वर्तविली होती. अन् अखेर घटना घडलीच. परिसरातील एका युवकाला मध्यरात्री हृदयविकाराचा झटका आला. त्याला रुग्णालयात घेऊन जात असताना रस्त्यावरील खड्ड्यात रुग्णवाहिका फसली, त्यामुळे वेळेत रुग्णालयात पोहचू न शकल्याने युवकाचा मृत्यू झाला. (काही कारणास्तव युवकाचे नाव देऊ शकत नाही.) ही घटना प्रशासनासाठी, लोकप्रतिनिधींसाठी नाकर्तेपणाची आहे. घटना १ सप्टेंबरच्या मध्यरात्रीची असून, ती आता उजेडात आली.मिहान प्रकल्पाचा गाजावाजा झाल्यानंतर अनेकांनी बेसा, बेलतरोडी या भागात निवासासाठी प्राथमिकता दर्शविली. त्यामुळे मनीषनगरपासून सोमलवाडा, बेलतरोडीपर्यंत नवीन नागपूर वसले. मोठमोठ्या फ्लॅट स्कीम, कॉलनी बिल्डरांनी बनविल्या. यातील काही कॉलनी शहरातील सीमेला लागून आहेत, त्यांचा समावेश ग्रामपंचायतीमध्ये होत आहे. त्यामुळे या कॉलनी, सोसायट्यांमध्ये विकास कामे ना मनपा करीत आहे, ना ग्रामपंचायत. बेसा ग्रामपंचायतअंतर्गत येणाऱ्या जयंतीनगरी-३ येथील रहिवाशांना याचा फटका बसत आहे. याच जयंतीनगरी-३ मध्ये तो युवक कुटुंबासह राहत होता. १ सप्टेंबरच्या मध्यरात्री त्याला हृदयविकाराचा झटका आला. तत्काळ अ‍ॅम्ब्युलन्स बोलावण्यात आली. तेव्हा पाऊसही जोराचा होता. अ‍ॅम्ब्युलन्स रुग्णाला घेऊन रुग्णालयाकडे निघाली. दरम्यान, रात्री १.३० वाजताच्या सुमारास प्रभूनगरातील गणपती मंदिराच्या समोरील खड्ड्यात ती अ‍ॅम्ब्युलन्स फसली. खड्ड्यातून अ‍ॅम्ब्युलन्स काढण्यासाठी अ‍ॅम्ब्युलन्समधील डॉक्टर, ड्रायव्हर आणि रुग्णासोबत असलेल्या महिलेचे प्रयत्न सुरू झाले. परंतु यश आले नाही. अखेर त्या महिलेने रात्री २ वाजता आजूबाजूच्या घरात जाऊन लोकांना उठविले. काही युवकांच्या मदतीने अ‍ॅम्ब्युलन्स खड्ड्यातून काढण्यात आली. पण यात अर्ध्या तासापेक्षा अधिक वेळ निघून गेला होता. रुग्णालयात पोहचल्यानंतर डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार सुरू केले. मात्र तो युवक उपचाराला प्रतिसाद देऊ शकला नाही आणि त्याचा मृत्यू झाला. उपराजधानीत जिथे विकासाचा झपाटा सुरू आहे, तिथे खड्ड्यात अ‍ॅम्ब्युलन्स फसल्याने रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो, ही शोकांतिका आहे. विशेष म्हणजे घटना घडल्यानंतर तो खड्डा परिसरातील नागरिकांनी बुजविला आहे.हा प्रशासनाने केलेला मर्डर आहेअ‍ॅम्ब्युलन्स फसणे, रुग्ण दगावणे या घटना दुर्गम भागात घडतात. आम्ही तर शहरात राहतोय. जिथे विकास आमच्या डोळ्यासमोर दिसतोय. आम्हीही हा विकास आमच्या घरापर्यंत पोहचविण्यासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधींकडे कित्येकदा गळ घातली. पण कर्तव्यदक्ष प्रशासन आमच्याबाबतीत शून्य ठरले. हा मृत्यू अकस्मात नाही, तर प्रशासनाने केलेला तो मर्डर आहे.वैशाली आसकर, घटनेच्या साक्षीदार, रहिवासी जयंतीनगरी - ३सहा वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहेआम्ही २०१३ पासून मूलभूत सोयीसुविधांसाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहोत. वेळोवेळी ग्रा.पं.ला निवेदन, नगरसेवकांना भेटून तक्रारी केल्या. पालकमंत्र्यांपर्यंत आम्ही आमच्या समस्या मांडल्या आहेत. रस्ते तरी सुरळीत करा, अशी आमची अपेक्षा आहे. मात्र आतापर्यंत कुणीच लक्ष दिले नाही. त्यामुळेच आमच्या कॉलनीतील एका सहकाऱ्याचा बळी गेला.राहुल राऊत, रहिवासी, जयंतीनगरी - ३

 

 

 

टॅग्स :Deathमृत्यूnagpurनागपूर