शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
3
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
4
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
5
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
6
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
7
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
8
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
9
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
10
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
11
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
12
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
13
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
14
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
15
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
16
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
18
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
19
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
20
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर

अमितेश कुमार यांनी नागपुरातून क्रिकेट जगतात खळबळ उडवून दिली होती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2020 12:33 PM

अर्थशास्त्र (इकॉनॉमिक्स) आणि सायबर कायद्याची मास्टरी बाळगणारे अमितेश कुमार नागपुरातील सायबर गुन्हेगारीवरही खास नजर ठेवणार आहेत.

ठळक मुद्देप्रभावी आणि परिणामकारक पोलिसिंग करणारसायबर क्राईमवर विशेष लक्ष !नवनियुक्त पोलीस आयुक्तांचा मनोदय

नरेश डोंगरे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू तसेच दाऊद इब्राहिमच्या हस्तकामध्ये होणारी बातचित टेप करून क्रिकेट विश्वात खळबळ उडवून देणारे नागपूरचे तत्कालीन आयपीएस अधिकारी अमितेश कुमार शुक्रवारी नागपुरात आपल्या पदाची धुरा सांभाळणार आहेत. देशाचे हृदयस्थळ असलेल्या नागपूरमध्ये प्रभावी आणि परिणामकारक पोलिसिंग करणार, असा मनोदय त्यांनी लोकमत'शी बोलताना व्यक्त केला.सध्याचे पोलीस आयुक्त डॉ. भूषण कुमार उपाध्याय यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून त्यांची बदली होईल, अशी चर्चा सुरू होती. मात्र येथे नवीन पोलीस आयुक्त कोण येणार याबाबत वेगवेगळी नावे चर्चेला होती. सर्वात आधी सुनील रामानंद यांचे नाव चर्चेला आले. त्यानंतर प्रभात कुमार, राजेंद्रसिंग यांच्याही नावाची चर्चा झाली आणि आज अखेर नागपूरचे पोलीस आयुक्त म्हणून अमितेश कुमार यांच्या नावाची घोषणा झाली.अमितेश कुमार यांनी २००५ ते २००७ अशी दोन वर्षे नागपूरला सेवा दिली आहे. त्यावेळी पोलीस आयुक्त म्हणून येथे शिवप्रतापसिंह यादव होते. नागपुरात आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा सामना होता आणि वेस्ट इंडिजची चमू हॉटेल प्राईडमध्ये मुक्कामी थांबली होती. अष्टपैलू खेळाडू मार्लोन सॅम्युअल यांच्यासाठी हॉटेल प्राईडच्या लँडलाईनवर वारंवार कॉल येत असल्याचे लक्षात आल्यामुळे तत्कालीन पोलीस उपायुक्त अमितेश कुमार यांनी त्यावर नजर रोखली.

त्यांच्या समयसुचकतेमुळे जगभरातील क्रिकेट रसिकांना मोठा धक्का देणारी खळबळजनक बाब उघड झाली. अंडरवर्ल्ड डॉन तसेच आंतरराष्ट्रीय गुन्हेगार दाऊद इब्राहिम याचा क्रिकेट बॅटिंगचा जगभरात गोरखधंदा सांभाळणारा राईटहॅण्ड मुकेश कोचर हा दुबईतून मॅच फिक्सिंगसाठी वारंवार मार्लोनसोबत संपर्क करत होता. हे लक्षात आल्यामुळे अमितेश कुमार यांनी हे संभाषण टेप करून क्रिकेट विश्वात खळबळ उडवून दिली होती. नंतर देश-विदेशातील तपास यंत्रणांनी या प्रकरणावर लक्ष वेधले होते. नागपूर पोलिसांच्या तपासाच्या आधारे आयसीसीने मार्लोन सॅम्युअल्स याच्यावर दोन वर्षाची बंदीही घातली होती.दरम्यान हा प्रकार उघड केल्याबद्दल तत्कालीन पोलीस आयुक्त शिवप्रतापसिंह यादव आणि अमितेश कुमार यांचे सर्वत्र कौतुक झाले होते. त्यानंतर अमितेश कुमार येथून बदलून गेले आणि आता १३ वर्षानंतर पोलीस आयुक्त म्हणून नागपुरात ते परत येत आहेत.या संबंधाने ‘लोकमत’ने त्यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी नागपूरला प्रभावी आणि परिणामकारक सेवा देऊ, असा मनोदय जाहीर केला.

अर्थशास्त्र (इकॉनॉमिक्स) आणि सायबर कायद्याची मास्टरी बाळगणारे अमितेश कुमार नागपुरातील सायबर गुन्हेगारीवरही ही खास नजर ठेवणार आहेत. १३ वर्षांपूर्वी नागपुरातील स्थिती वेगळी होती. आताचे गुन्हेगारी स्वरूप बदलले आहे. त्यामुळे येथील परिस्थितीचा अभ्यास करून नंतर आपण आपली भूमिका ठरवू, असे ते म्हणाले. नागरिक आणि पोलिसांचे सलोख्याचे संबंध प्रस्थापित करण्यासोबतच सर्वांना सोबत घेऊन आपण येथे काम करू, असे ते म्हणाले. शुक्रवारी आपण पदाची जबाबदारी स्वीकारू, असेही त्यांनी लोकमतला सांगितले.

 

टॅग्स :police commissioner office Nagpurपोलीस आयुक्त कार्यालय