शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
2
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
3
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
4
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
5
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
6
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
7
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
8
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
9
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
10
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
11
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
12
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
13
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
14
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
15
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
16
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
17
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
18
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
19
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
20
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

नागपुरातील आयडीबीआय कर्ज घोटाळ्याची रक्कम ४ कोटी ३० लाखांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 11:45 PM

आयडीबीआयच्या पावणेदोन कोटींच्या पीक कर्ज घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या पोलिसांना पुन्हा एक घोटाळा हाती लागला आहे. त्यानुसार, आरोपींनी भुश्याची पोती दाखवून ते तांदूळ आहे, अशी बतावणी करत अडीच कोटींचे कर्ज उचलले. त्यामुळे आता या कर्ज घोटाळ्याची रक्कम ४ कोटी ३० लाखांवर पोहचली आहे.

ठळक मुद्देतांदळाच्या नावाखाली दाखवली भुसा भरलेली पोती : नवीन खुलासे होण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आयडीबीआयच्या पावणेदोन कोटींच्या पीक कर्ज घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या पोलिसांना पुन्हा एक घोटाळा हाती लागला आहे. त्यानुसार, आरोपींनी भुश्याची पोती दाखवून ते तांदूळ आहे, अशी बतावणी करत अडीच कोटींचे कर्ज उचलले. त्यामुळे आता या कर्ज घोटाळ्याची रक्कम ४ कोटी ३० लाखांवर पोहचली आहे.२०१३ - २०१४ या कालावधीत आयडीबीआय बँकेच्या गोधनी शाखेतून बनावट कागदपत्रांच्या आधाारे पावणेदोन कोटींचे कर्ज लाटले. कर्जाची परतफेड न झाल्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केल्यानंतर हा कर्जघोटाळा पुढे आला. त्यानंतर बँकेतर्फे गुन्हे शाखेकडे तक्रार नोंदवण्यात आली. चौकशीनंतर गुन्हे शाखेने १९ नोव्हेंबरला मानकापूर ठाण्यात १६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यातील प्रशांत पुंडलिकराव बोरकर, राजेश कोठीराम गुहे, संतोष बजरंग नंदागवळी, अनिल हिरामण घोडे, सारंग अशोकराव चिटकुले, सचिन अशोकराव चिटकुले, विक्रांत अमृत कंगाले, रामाजी कवडूजी भेंडे, जसवंतसिंह बलविरसिंह प्रधान, पतिराम बाबूलाल बावणकर, लखनलाल चंदनलाल राठोड आणि योगिराज बालकिसन बिटले यांना पोलिसांनी अटक केली. तर मंजितसिंग प्रधान, योगिराज आदे, अनुपसिंग प्रधान आणि विकास काकडे फरार आहेत.अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या चौकशीतून त्यांनी भंडारा जिल्ह्यातून आयडीबीआय बँकेतूनही पीक आणि गोदामाच्या नावाने अडीच कोटींचे कर्ज उचलल्याचे पुढे आले आहे. आरोपींनी हे कर्ज उचलण्यापूर्वी एका ठिकाणी गोदामात भुसा भरलेले पोते ठेवले. त्यावर दर्शनी भागात तांदळाची पोती ठेवली. ही सर्व तांदळाची पोती आहेत, असे आरोपींनी बँक अधिकाऱ्यांना सांगितले आणि अधिकाऱ्यांनीही त्यावर विश्वास ठेवून कर्जाची रक्कम आरोपींच्या हातात दिल्याची माहिती पुढे आली आहे.अधिकाऱ्यांची भूमीका संशयास्पदया एकूणच प्रकरणात आरोपींसोबत बँक अधिकाऱ्यांची भूमिकाही संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. कोट्यवधीचे कर्ज उपलब्ध करून देताना बँक अधिकारी एवढे गाफिल कसे राहू शकतात, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पोलिसांनी कसून चौकशी केल्यास या प्रकरणात अनेक बडे मासे पोलिसांच्या हाती लागू शकतात.

टॅग्स :bankबँकfraudधोकेबाजी