दुर्गेश प्रकाश प्रधान (वय २३) असे फसगत झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो कामठीजवळच्या घोरपड येथील रहिवासी आहे. त्याला १८ ऑक्टोबरच्या रात्री ७ वाजता सायबर गुन्हेगाराने फोन करून कर्ज हवे का, अशी विचारणा केली. प्रधानने सहमती दर्शविताच आरोपीने दोन लाखांचे कर्ज झटपट उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवून त्याला आयसीआयसीआय बँकेचा खाते क्रमांक पाठविला. त्यात त्याला ७ १८ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर दरम्यान वेगवेगळया सबबी सांगून ४४,४५४ रुपये भरायला बाध्य केले आणि कोणत्याही प्रकारचे कर्ज उपलब्ध करून दिले नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने दुर्गेश प्रधानने लकडगंज ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी या प्रकरणी गुरुवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध घेतला जात आहे.
----
तरुणाने लावला गळफास
नागपूर : शारदानगर हुडकेश्वर परिसरात राहणारा नरेश प्रभाकर गायकवाड (वय २१) याने गुरुवारी रात्री ७.३० च्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केली. श्रुती शरदराव खोले यांनी दिलेल्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.
----