शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
2
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत कोणता मुद्दा यावेळी ठरणार निर्णायक?
3
पती-पत्नीला एकमेकांच्या हेरगिरीची परवानगी नाही, मद्रास व हिमाचल हायकोर्टाचे मत
4
'ऑलिम्पिक २०३६'च्या आयोजनास सज्ज, भारताने आयओसीकडे सोपविले आशय पत्र
5
'टीम इंडिया ऑस्ट्रेलियात ४-० ने जिंकणार नाही...', सुनील गावसकर यांचे धक्कादायक भाकीत
6
रणजी क्रिकेट: पृथ्वी शॉ याला मुंबईच्या संघात स्थान नाहीच, श्रेयसचं पुनरागमन
7
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
8
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
9
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
11
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
12
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
13
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
14
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
16
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
17
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
18
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
19
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
20
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...

अपंगांना सक्षम करण्यासाठी नागपूरच्या अमृता-निकेशची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 11:57 AM

अपंगांवर सहानुभूती दाखविण्यापेक्षा त्यांना रोजगार उपलब्ध केला तर ते आपोआपच सक्षम होतील. नागपुरातील दोन तरुण तोच प्रयत्न मोठ्या उत्साहाने करीत आहेत. अमृता आणि निकेश अशी या दोन तरुणांची नावे.

ठळक मुद्देआपण फाऊंडेशनचे अनेक उपक्रम शेकडो अपंगांना जोडले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अपंगांवर सहानुभूती दाखविण्यापेक्षा त्यांना रोजगार उपलब्ध केला तर ते आपोआपच सक्षम होतील. नागपुरातील दोन तरुण तोच प्रयत्न मोठ्या उत्साहाने करीत आहेत. अमृता आणि निकेश अशी या दोन तरुणांची नावे. कुठे अपंगांनी तयार केलेल्या वस्तूंसाठी प्रदर्शन भरव किंवा एखाद्याला व्यवसायासाठी जागा मिळवून दे, अशी त्यांची धडपड सातत्याने सुरू असते. या धडपडीतून त्यांनी शेकडो अपंगांना जोडलेच नाही तर काहींना रोजगारही मिळवून दिला आहे.सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील अमृता अडावदे हिने मास कम्युनिकेशनमध्ये एमए केले आहे तर निकेश पिने यानेही बॅचलर इन जर्नालिझमचा कोर्स केला. दोघांनाही सामाजिक कार्याची आवड असल्याने ते विविध सामाजिक संघटनांशी जुळले आहेत. अ.भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यातही त्यांचा महत्त्वाचा सहभाग असतोच. मात्र या दोन धडपड्यांनी अपंगांसाठी विशेष काही तरी करण्याचे ध्येय मनाशी बाळगले आहे. सामाजिक भान जपणाऱ्या अमृता आणि निकेशच्या मनात अपंग व्यक्तींबद्दल सहानुभूती होती. अनेक अपंगांना भेटल्यानंतर अपंगांच्या व्यथा, वेदनांची जाणीव त्यांना झाली. मात्र त्यांच्यासाठी केवळ सहानुभूती ठेवण्यात अर्थ नाही तर ठोस काहीतरी करण्याची गरज आहे, ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली. या विचारातून मग त्यांचे कार्य सुरू झाले.अपंगांमध्ये शारीरिक कमतरता असली तरी त्यांच्यात विशेष कौशल्य असते. हे कौशल्य विकसित करण्याचे आणि मार्केटिंग करून समाजासमोर आणण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केला. या कामातून या दोघांनीच ‘आपण फाऊंडेशन बहुउद्देशीय संस्था’ची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून लोकांची मदत घेत अपंग व्यक्तींनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन भरविणे किंवा एखाद्या प्रदर्शनात अपंगांच्या वस्तूंना स्टॉल मिळवून देणे त्यांनी केले.मेळघाटमधील आदिवासी महिलांनी तयार केलेल्या स्ट्रीप्स बॅगचे स्वतंत्र प्रदर्शन त्यांनी नागपुरात आयोजित केले. या बॅग दिसायला आकर्षित असल्याने त्या महिलांना बॅगसाठी अनेक संस्थांनी आॅर्डर दिली होती.अपंगांना कायम रोजगार मिळेल यासाठी काही ठिकाणी नियमित जागेची व्यवस्था त्यांनी केली. याशिवाय कौशल्य असलेल्या अपंग इतरांना प्रशिक्षण देऊ शकतील, असा उपक्रम त्यांनी संस्थेच्या माध्यमातून सुरू केला. या प्रयत्नामधून १० अपंग व्यक्तींना नियमित रोजगार मिळाल्याचे अमृताने सांगितले.अपंगांसाठी शासनाच्या विविध योजना आहेत. त्याचा लाभ त्यांना मिळावा म्हणून त्यांचे प्रयत्न सुरू असतात. ज्येष्ठ नागरिकांप्रमाणे अपंगांनाही रांगेत उभे राहावे लागू नये असे त्यांना वाटते. अपंगांच्या समस्यांना जातीपातीचे बंधन नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी स्वतंत्र समाजभवन व्हावे, कुठल्याही शासकीय कार्यालयात अपंग व्यक्तीला व्यवसाय करण्यासाठी छोटीशी जागा उपलब्ध करून द्यावी. दत्तक-पालक योजनेप्रमाणे गरीब अपंगांच्या मुलांना सक्षम लोकांनी शिक्षणासाठी मदत करावी. असे अनेक उद्दिष्ट अमृता आणि निकेशला साध्य करायचे आहेत. यासाठी राजकारणी, महानगरपालिकांसारख्या संस्थांचे पदाधिकारी व अधिकाऱ्यांना भेटून ते अपंगांच्या समस्या मांडत असतात. त्यांच्या कामामुळे अपंगांच्या विविध संस्थांचे ४०० च्यावर सदस्य त्यांच्याशी जुळले आहेत. आपण फाऊंडेशनच्या माध्यमातून संविधान समारोह, भजनसंध्या, सॅनिटरी नॅपकीन जनजागृती कार्यक्रम, स्नेहमीलन, गीतगायन कार्यक्रम, अपंगांच्या वस्तूंची विक्री व प्रदर्शन, फराळ व कपडे वितरण असे अनेक उपक्रम त्यांनी या काळात राबविले आहेत. येत्या मे महिन्यात अशाच एका प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार असून, त्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे अमृताने लोकमतशी बोलताना सांगितले.या प्रयत्नातून आपल्याला काही लाभ मिळेल, हा त्यांचा उद्देश नाही. ते आजही कफल्लकच आहेत. केलेल्या सामाजिक कामाचे वर्णन त्यांना करता येत नाही. मात्र इतरांसाठी नि:स्वार्थ व निरपेक्ष भावनेने झटण्यात जो आनंद आणि समाधान मिळते, ते प्रेरणादायी समाधान या दोन्ही तरुणांच्या चेहऱ्यांवर मात्र स्पष्ट जाणवते.

टॅग्स :social workerसमाजसेवक