शहरं
Join us  
Trending Stories
1
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
2
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
3
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
4
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
5
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
7
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
8
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
9
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
10
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
12
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
13
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
14
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
15
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
16
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
17
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
18
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
19
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
20
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान

कोर्टाच्या आवारातील समोसा महागला, वकिलाने नाराज होत थेट राजीनामाच देऊन टाकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2022 10:40 AM

डीबीएचे अधिकारी वकिलांचे हित बघण्यापेक्षा आपले खिसे भरण्यासाठी त्यांच्याकडून अधिक पैसे वसूल करीत असल्याचा आरोप बोगाटी यांनी केला आहे.

नागपूर : दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. इंधन दर, गॅसवाढ होत असल्याने घराघरांत या विषयावरून चर्चा वाढल्या आहेत. एका वकिलानेन्यायालय आवारातील कँटीनमधील समोसा महागल्याच्या कारणावरून चक्क राजीनामाच देऊन टाकला. त्यांचा राजीनामा सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.

जिल्हा बार असोसिएशनचे कार्यकारिणी सदस्य अॅड धर्मराज बोगाटी यांनी आपल्या राजीनाम्यात, डिबीएतर्फे चालवण्यात येणाऱ्या कँटिनमध्ये खाद्यपदार्थांचे दर मर्यादेपलिकडील असल्याचे नमूद केले आहे. या कँटिनमधील एक प्लेट समोस्याची किंमत ३० रुपये असून बाहेरच्या तुलनेत येथील दर जास्त असल्याचा आरोपही बोगाडे यांनी केला आहे.

खरतर, डीबीएच्या कँटिनने वकिलांना वाजवी किमतीत खाद्यपदार्थ उपलब्ध करून द्यायला हवेत. परंतु, डीबीएचे अधिकारी वकिलांचे हित बघण्यापेक्षा आपले खिसे भरण्यासाठी त्यांच्याकडून अधिक पैसे वसूल करीत असल्याचा आरोप बोगाटी यांनी केला आहे. समोसा महागल्यावरून राजीनाम्याची ही घटना नागपुरात चर्चेत आहे.

इतर विषय नाहीत का?

गेल्या काही दिवसांपासून खाद्य पदार्थांच्या किमतीत सातत्याने वाढ होत असून हॉटेलमधील खाद्यपदार्थही महागलेत. जिल्हा न्यायालयातील कँटिनमधील समोस्याच्या किमतीतही वाढ करण्यात आली. पण, समोस्याच्या किंमतीवरून कुणी राजीनामा देत असेल तर जिल्हा न्यायालयात इतर दुसरे मुद्देच उरले नाहीत, असेच म्हणाले लागेल अशी प्रतिक्रिया जिल्हा बार असोसिएशनच्या अध्यक्ष अॅड कमल सतुजा यांनी दिली. ॲड. बोगाटी यांच्या राजीनाम्याचा विचार करू, असेही त्या म्हणाल्या

टॅग्स :InflationमहागाईCourtन्यायालयadvocateवकिलResignationराजीनामाnagpurनागपूर