शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

नागपुरात दर महिन्याला सरासरी ८४४ गंभीर गुन्हे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2024 5:28 PM

२०२४ मध्येही गुन्ह्यांची सरासरी कायम : हत्या, विनयभंग, अत्याचारांची आकडेवारी चिंताजनक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराजधानीत नवीन वर्षात गुन्ह्यांचा दर कमी होईल अशी अपेक्षा वर्तविण्यात येत होती. मात्र, प्रत्यक्षात २०२३ च्या तुलनेत या वर्षी गंभीर गुन्ह्यांची संख्या वाढली आहे. मागील वर्षी दर महिन्याला सरासरी ८३३ गंभीर गुन्हे नोंदविण्यात आले होते. यंदा हा आकडा सरासरी ८४४ वर गेला आहे. २०२१ पासूनच्या आकडेवारीवर नजर टाकली, तर हा सर्वाधिक आकडा आहे. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे. उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत नागपूर पोलिसांकडे शहरातील गंभीर गुन्ह्यांबाबत विचारणा केली होती. २०२१ पासून ते मार्च २०२४ या कालावधीत नागपुरात किती गंभीर गुन्हे नोंदविण्यात आले, हत्या अत्याचार-विनयभंग-फसवणूक यांचे प्रमाण किती होते याबाबत त्यांनी विचारणा केली होती. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार नागपुरात जानेवारी ते मार्च या कालावधीत २ हजार ५३४ गुन्ह्यांची नोंद झाली. याची सरासरी महिन्याला ८३३ इतकी होत आहे. २०२३ मध्ये संपूर्ण वर्षभरात ९ हजार ९९९ गुन्हे नोंदविल्या गेले होते. तर, २०२१ मध्ये ८ हजार २३२ व २०२२ मध्ये ७ हजार ७९६ गुन्ह्यांची नोंद झाली होती.

मागील काही काळापासून नागपुरात हत्यांच्या प्रकरणांमुळे पोलिसांची चिंता वाढली आहे. जानेवारी ते मार्च या कालावधीत नागपुरात २० हत्यांची नोंद झाली. २०२३ मध्ये पूर्ण वर्षभरात ७९ हत्या झाल्या होत्या.

*अशी आहे गुन्ह्यांची आकडेवारीगुन्हा                                     २०२१                     २०२२                      २०२३                      २०२४ मार्चपर्यंत हत्या                                     ९५                             ६५                           ७९                              २०चोरी                                     २५९०                       २५०३                       ३५०५                           ७६८फसवणूक                              ४८८                         ४९२                         ६६०                            १७९दंगे                                         १५२                          ७६                           ११५                              ४०अत्याचार                               २३४                          २५०                         २६३                              ७२विनयभंग                               ३५६                         ३४०                          ५०६                             ११४

महिला अत्याचारावर नियंत्रण कसे येणार ?

महिला अत्याचारांचा मुद्दा पोलिसांसाठी डोकेदुखी ठरतो आहे. २०२३ मध्ये नागपुरात वर्षभरात महिला अत्याचाराच्या २६३ गुन्ह्यांची नोंद झाली होती व दर महिन्याची सरासरी २२ गुन्हे इतकी होती. या वर्षी तीनच महिन्यांत ७२ गुन्हे नोंदविले गेले असून, प्रतिमहिना सरासरी २४ इतकी आहे. याशिवाय विनयभंगाच्या गुन्ह्यांतवरदेखील फारसे नियंत्रण आलेले नाही. २०२३ मध्ये विनयभंगाचे ५०६ गुन्हे नोंदविल्या गेले होते व दर महिन्याची सरासरी ४२ इतकी होती. या वर्षी तीनच महिन्यांत ११४ गुन्ह्यांची नोंद झाली असून दर महिन्याला विनयभंगाचे सरासरी ३८ गुन्हे दाखल झाले आहेत

निवडणुकांच्या वर्षात दंगे वाढीस२०२४ हे निवडणुकीचे वर्ष असून जागोजागी पोलिसांचा बंदोबस्त होता. मात्र, पोलिसांच्या आकडेवारीनुसार तीन महिन्यांत दंग्यांच्या घटना वाढीस लागल्या. २०२३ मध्ये दंगलीच्या कलमांतर्गत ११५ (प्रति महिना १०) गुन्हे दाखल झाले होते. या वर्षी हा आकडा ४० (प्रति महिना १३) इतका आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRobberyचोरीtheftचोरी