शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
2
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
3
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
4
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
5
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
6
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
9
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
10
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
11
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
12
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
13
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
14
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
15
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
16
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
17
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
18
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
19
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
20
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन

आॅनलाईन जगात आत्मविश्वासाचे पाऊल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 2:08 AM

सोशल मीडियाचा वापर आणि कॅशलेस व्यवहार आत्मसात करणे ही वर्तमान काळाची गरज झाली आहे.

पारिजातक प्रतिष्ठान : आॅनलाईन साक्षरता कार्यशाळालोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सोशल मीडियाचा वापर आणि कॅशलेस व्यवहार आत्मसात करणे ही वर्तमान काळाची गरज झाली आहे. मात्र इंटरनेट आॅनलाईन जगात वावरताना आपली फसवणूक होणार नाही, याची काळजी घेणे आज अगत्याचे झाले आहे. त्यामुळे आम्हाला जमत नाही म्हणून निराश होण्यापेक्षा आॅनलाईन व्यवहार हाताळताना तंत्रज्ञान अधिक चांगल्या आणि सोप्या पद्धतीने समजून घेण्याची गरज आहे. हे तंत्रज्ञान सर्व वयोगटातील नागरिकांना समजावे यासाठी पारिजातक प्रतिष्ठान आणि इंडियन वेब टेक्नालॉजीजच्यावतीने नि:शुल्क आॅनलाईन साक्षरता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. शेवाळकर सभागृह येथे आयोजित कार्यशाळेत तंत्रज्ञान विशेषज्ञ मोहिनी मोडक यांनी सोशल मीडिया आणि सुभाष गोरे यांनी कॅशलेस व्यवहारावर मार्गदर्शन केले. व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आदी सोशल मीडियाचा वापर वर्तमान काळात जगण्याचा भाग झाला आहे. दुसरीकडे रोखरहित (कॅशलेस) व्यवहार ही आजच्या काळाची गरज झाली आहे. या आॅनलाईन गोष्टी आत्मसात करणे प्रत्येकासाठी निकडीचे झाले आहे. कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात मोहिनी मोडक यांनी मार्गदर्शन करताना माहितीच्या मायाजाळात नेमकी माहिती कशी शोधावी, संगणकाच्या की-बोर्डवरील स्पेशल कॅरेक्टर्सचा वापर, स्पेलिंग, शब्दकोश, हवामानाची माहिती, चलनबदल, गणित, फोटो बघणे आदींवर माहिती दिली. ई-मेल अकाऊंट कसे उघडावे, पासवर्ड, अटॅचमेंट डाऊनलोड करण्यास हॅकिंंग, ई-मेल सुरक्षा आदी विषयही मोडक यांनी सोप्या भाषेत समजावून सांगितले. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपसह इन्स्टाग्राम, टिष्ट्वटर आदी सोशल मीडियाबाबतही त्यांनी विस्तृत माहिती दिली.कॅशलेस व्यवहार कसे सुरक्षितसुभाष गोरे यांनी कॅशलेस व्यवहारावर मार्गदर्शन केले. नोटाबंदीच्या निर्णयानंतर कॅशलेस व्यवहारांमध्ये वाढ झाली आहे. इंटरनेटवर नेटबँकिंग आणि विविध सुविधांचे अ‍ॅप्स उपलब्ध आहेत. त्याचा वापर येत्या काळात वाढणार आहे. त्यामुळे हे तंत्रज्ञान शिकून त्याचा सुरक्षित वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले. एखादे अ‍ॅप्स इन्स्टॉल कसे करावे, कॅशलेस पेमेंटसाठी उपलब्ध असलेले सुरक्षित पर्याय, कार्ड स्वॅपिंग, मोबाईल बँकिंग याबाबत गोरे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यशाळेचे आयोजक आणि पारिजातक प्रतिष्ठानचे संचालक डॉ. नीतेश खोंडे, लीना खोंडे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. महिला, तरुण, ज्येष्ठ नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.काही टिप्सव्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकचा गैरवापर टाळण्यासाठी फिल्टर्स लावाबँकेच्या व्यवहाराशी दीर्घकाळ वापरला जाणारा मोबाईल क्रमांक लिंक कराभीम अ‍ॅप, महावितरणचे अ‍ॅप, ओला किंवा उबेर अ‍ॅपच्या सुविधेचा वापर चांगलायू-ट्यूबचे व्हिडीओ म्हणजे माहितीचा खजिनाकोणत्याही प्रलोभनांना व खोट्या माहितीला बळी पडू नकाइंटरनेट वापरताना सुरक्षेची काळजी घेणे अत्यावश्यक