लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : युवक काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकीत बुधवारी गोंधळ झाला. ९ सप्टेंबर रोजी सुरू झालेल्या या प्रक्रियेत प्रदेश अध्यक्ष, प्रदेश महामंत्री, शहर अध्यक्ष, महामंत्री, विधानसभा अध्यक्षपदासाठी मतदान करण्यात आले. दरम्यान, पश्चिम नागपूरसाठी एहबाब कम्युनिटी हॉलमध्ये बोगस मतदान होत असल्याचा आरोप करीत उमेदवार व समर्थकांनी गोंधळ घातला. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी मात्र ही अंतर्गत बाब असल्याचे म्हटले आहे.मतदानाच्या अंतिम दिवशी पश्चिम व दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघासाठी मतदान झाले. या मतदानाबाबत युवक काँग्रेसच्या मतदारांंमध्ये उत्सुकता दिसून आली नाही. एकूण १२५०० मतदारांपैकी फक्त ५०२३ मतदारांनी मतदान केले. दुपारी ३ वाजता मतदान संपल्यानंतर युवक काँग्रेसच्या एका गटाने बोगस मतदानाचा आरोप करीत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. शहराध्यक्षपदाचे उमेदवार धीरज पांडे म्हणाले, आपण मतदान केंद्रात उमेदवारांचे प्रतिनिधी ठेवण्याची मागणी केली होती. दक्षिण पश्चिम नागपुरातील मतदान केंद्रात प्रतिनिधी होते. पश्चिम नागपुरातील एका केंद्रावर ग़डबड झाल्याची माहिती त्यांना मिळाली. दुसरे एक उमेदवार तौसिफ खान व इरशाद शेख तेथे उपस्थित होते. यावेळी काही कार्यकर्त्यांनी बोगस मतदान होत असल्याचा आरोप करीत गोंधळ घातला. या दरम्यान काही कार्यकर्त्यांनी तेथे उपस्थित झेडआरओ सोबत धक्काबुक्की केली.आज मतमोजणीआज, गुरुवारी सकाळी १० वाजता देवडिया काँग्रेस भवन येथे शहराध्यक्ष, महामंत्री व विधानसभा अध्यक्षपदासाठी मतमोजणी होईल. शहर अध्यक्षपदासाठी धीरज पांडे, तौसिफ खान व इरशाद शेख यांच्यात सामना होईल, अशी चिन्हे आहेत. यानंतर प्रदेश पदाधिकाऱ्यांसाठी मतमोजणी होईल. ही मतमोजणी कुठे होईल, हे अद्याप स्पष्ट नाही. नागपूर किंवा पुणे असे दोन पर्याय समोर आले आहेत.असे झाले मतदानमतदारसंघ एकूण मतदार मतदानउत्तर नागपूर ३३०० ११५१पूर्व नागपूर ११०० ४९१मध्य नागपूर ३६०० १२९०दक्षिण नागपूर २३०० ११००पश्चिम नागपूर ११२८ ५३०दक्षिण नागपूर ९०० ४११