लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: स्टेजवर गात गातच अंकित तिवारी खाली उतरतो आणि समोरच्या रांगेत बसलेल्या मुख्यमंत्र्यांच्या बाजूला बसून त्यांना सोबत गाण्याचे सुचवतो.. त्याच्या सुरात सूर मिळवीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गाऊ लागतात.. सुन रहा है ना तू.. रो रहा हूँ मैं... अन् सभागृहात टाळ्यांचा आणि हशांचा एकच कल्लोळ उसळतो.. लाडक्या मुख्यमंत्र्यांचे हे गाणे जनता सहर्ष उचलून धरते तर मुख्यमंत्र्यांची गायनाची उत्तम जाण असलेल्या अर्धांगिनी अमृता फडणवीस टाळ्यांच्या गजरात त्याचे स्वागत करतात..लोकमत सखी मंचच्या संस्थापक व संगीत साधक ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिनिमित्त लोकमत मिडिया ग्रूपतर्फे दिल्या जाणाऱ्या पाचव्या सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार समारंभात अंकित तिवारी या आजच्या पिढीच्या गळ्यातील ताईत असलेल्या युवा गायकाने एकाहून एक सरस गाणी सादर करत अख्खे स्टेडियम नुसते थिरकत ठेवले.याच कार्यक्रमात आशिकी २ या सिनेमातील त्याचे सर्वात लोकप्रिय गाणे सुन रहा है ना तू, हे जेव्हा त्याने सुरू करण्याचे सुतोवाच केले तेव्हा जनतेने टाळ्यानी अवघे स्टेडियम दणाणून टाकले. त्यावर कळस तेव्हा चढला जेव्हा अंकित हे गाणे गात गात स्टेजखाली येऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या शेजारी येऊन बसला व त्यांना गाण्यात सहभागी करून घेतले. या गाण्याचे एक कडवे मुख्यमंत्र्यांनी त्याच्यासोबत गायले आणि नागपूरकरांनी न भुतो न भविष्यती असा तो क्षण आनंदाच्या गजरात अनुभवला.
जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गातात, 'सुन रहा है ना तू, रो रहा हू मै'...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 12:43 PM
स्टेजवर गात गातच अंकित तिवारी खाली उतरतो आणि समोरच्या रांगेत बसलेल्या मुख्यमंत्र्यांच्या बाजूला बसून त्यांना सोबत गाण्याचे सुचवतो.. त्याच्या सुरात सूर मिळवीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गाऊ लागतात.. सुन रहा है ना तू.. रो रहा हूँ मैं...
ठळक मुद्देसूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार समारंभातील परमोच्च क्षणहशा आणि टाळ्यांच्या कडकडाटात नागरिकांनी थोपटली मुख्यमंत्र्यांची पाठ