नागपूर - १९७१ च्या युद्धादरम्यान पाकिस्तानी सैनिकांनी लावलेल्या भूसुरुंग स्फाेटात मेजर जनरल ईयान कार्डाेजाे गंभीर जखमी झाले हाेते. एका पायाची स्थिती अतिशय भीषण हाेती. या परिस्थितीत वेळेवर डाॅक्टरांचे उपचार मिळणे कठीण हाेते. कार्डाेजाे यांनी अतिशय टाेकाचा निर्णय घेतला आणि जवळ असलेल्या खुखरीने आपला पाय स्वत:च्या हाताने शरीरापासून वेगळा केला. स्वत: कार्डाेज यांच्याकडून हा थरारक प्रसंग ऐकताना उपस्थित श्राेत्यांच्या अंगावर काटा उभा राहिला.
‘सेंटर फॉर लद्दाख अॅण्ड जम्मू अॅण्ड कश्मीर स्टडीज’ या एनजीओच्यावतीने मेजर जनरल इयान कार्डोज़ो एवीएसएम एसएम (सेवानिवृत्त) व त्यांच्या पत्नी प्रिसिला कार्डोज़ो यांच्या नागपूर यात्रेचे आयाेजन केले. याअंतर्गत डिफेंस विंगच्या नागपूरस्थित उत्तर महाराष्ट्र व गुजरात उपक्षेत्र मुख्यालयाकडून त्यांना सपत्नीक सन्मानित करण्यात आले. कार्डाेज हे गाेरखा राईफल्सचे मेजर जनरल हाेते तसेच एक बटालियन व एक ब्रिगेडची कमान सांभाळणारे दिव्यांग अधिकारी हाेते व ‘काडतूस साब’ म्हणून ओळखले जात हाेते. कार्यक्रमात कार्डाेजाे यांनी १९७१ च्या युद्धाचे अनुभव कथन केले. यावर त्यांनी ‘१९७१ : स्टोरीज़ ऑफ़ ग्रिट अॅण्ड ग्लोरी’ ही आत्मकथासुद्धा लिहिली आहे. आपल्या पत्नीचा उल्लेख करीत त्यांनी सैनिकांचे मनाेबल मजबूत करण्यात त्यांच्या पत्नी, माता व इतर महिलांचे याेगदान अतिशय महत्त्वाचे असते. त्यांनी रेजिमेंटल भावना आणि मूल्यांचे महत्त्व माेठे असल्याचे सांगत यामुळे एका सैनिकाला युद्धात सर्वश्रेष्ठ याेगदान देण्यासाठी प्रेरणा देत असतात. देशाच्या प्रगतीसाठी संरक्षण क्षेत्र आणि कार्पाेरेट क्षेत्राची एकमाेट बांधण्याची आवश्यकता असल्याची भावना मेजर जनरल कार्डाेजाे यांनी व्यक्त केली.
यावेळी कार्डाेजाे यांना स्मृतीचिन्ह प्रदान करण्यात आले. त्यांनी उपस्थितांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. गार्ड्स रेजिमेंटल सेंटर ब्रिगेडचे कमांडेंट ब्रिगेडियर के. आनंद यांनी आभार मानले.