लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक योजना जाहीर करते. त्याचा शुभारंभही होतो, परंतु योजनेचा लाभ प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहचायला प्रतीक्षाच करावी लागते. परंतु एखाद्या योजनेचा शुभारंभ होताच त्याच दिवशी शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाल्याचे सुखद चित्र रविवारी नागपुरात पाहायला मिळाले. योजनेचा शुभारंभ झाला आणि शेतकऱ्यांच्या खात्यात पैसेही जमा झाले, या सुखद आश्चर्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरही हास्य फुलले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकºयांसाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना जाहीर केली. केंद्र सरकारची ही अतिशय महत्त्वाकांक्षी योजना असून, याची सुरुवात रविवारी देशभरात करण्यात आली. नागपुरातही याची सुरुवात झाली. रविवारी पहिल्याच दिवशी नागपूर जिल्ह्यातील तब्बल ४,४८३ शेतकऱ्यांच्या खात्यात थेट दोन हजार रुपये जमा झाले. पैसे जमा झाल्याचे एसएमएसही त्यांच्या मोबाईलवर आले, हे विशेष.नागपूर जिल्ह्यात एकूण शेतकरी ३ लाख ४४ हजार ११ असून, दोन हेक्टरपेक्षा कमी शेतजमीन असणारे २ लाख ४३ हजार २७० शेतकरी आहेत. दोन हेक्टरपर्यंत क्षेत्र असलेल्या शेतकरी कुटुंबीयास दोन हजार प्रति हप्ता याप्रमाणे दरवर्षी तीन हप्त्यात सहा हजार रुपयापर्यंत लाभ मिळणार आहे. या योजनेचा पहिला हप्ता ३१ मार्चपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा होणार आहे.योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांचे निश्चितीकरण करून लाभार्थ्यांची यादी तयार करणे. यासाठी शेतकऱ्याचे नाव, लिंग, प्रवर्ग, आधार क्रमांक, बँकखाते क्रमांक, आयएफएससी कोड, मो.क्र. जन्मतारीख व पत्ता इत्यादी माहिती शेतकऱ्यांना द्यावयाची आहे. तसेच सामायिक कुटुंबातील एका सदस्याने योजनेचा लाभ बँक खात्यावर अदा करण्यासाठी स्वयं घोषणापत्र द्यावयाचे आहे. लाभार्थ्यांची यादी अंतिम झाल्यावर केंद्र शासनाच्या पीएम किसान पोर्टलवर अपलोड केली जाणार आहे. त्यानंतर लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर डीबीटीद्वारे निधी जमा होणार आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तर, जिल्हास्तर, तालुकास्तर व ग्रामस्तरावर सनियंत्रण समित्या गठित करण्यात आल्या असून, त्यानुसार योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे.यासाठी जिल्हा प्रशासनाचे कार्य वाखाणण्याजोगे आहे. नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख २ हजार ३१७ पात्र शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती गोळा करून, ती अपलोड करण्यात आली आहे. यापैकी ६० हजारावर शेतकऱ्यांच्या अर्जांची तपासणी करून लाभ पोहचविण्याची कारवाई सुरू झाली आहे.प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्यापर्यंत पोहचणार योजनापंतप्रधानांची ही योजना अतिशय चांगली आहे. ती शेवटच्या पात्र शेतकऱ्यापर्यंत पोहचविण्यात येईल, अशी योजना आखली आहे. आतापर्यंत एक लाख दोन हजारावर शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती अपलोड झाली आहे. इतरही लाभार्थ्यांची माहिती अपलोड केली जात आहे. प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत योजना पोहोचावी यासाठी चित्ररथ तयार करून तो गावोगावी फिरवला जात आहे. या योजनेपासून एकही लाभार्थी शेतकरी वंचित राहणार नाही.अश्विन मुदगल, जिल्हाधिकारी
अन् शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 11:27 PM
सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक योजना जाहीर करते. त्याचा शुभारंभही होतो, परंतु योजनेचा लाभ प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहचायला प्रतीक्षाच करावी लागते. परंतु एखाद्या योजनेचा शुभारंभ होताच त्याच दिवशी शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाल्याचे सुखद चित्र रविवारी नागपुरात पाहायला मिळाले. योजनेचा शुभारंभ झाला आणि शेतकऱ्यांच्या खात्यात पैसेही जमा झाले, या सुखद आश्चर्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरही हास्य फुलले.
ठळक मुद्देपंतप्रधान किसान सन्मान निधी योजनापहिल्याच दिवशी ४,४८३ शेतकऱ्यांच्या खात्यात थेट निधी जमा